Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!

Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.

सुरभि जगदीश | Updated: Apr 16, 2024, 07:26 AM IST
Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील! title=

Rohit Sharma: रविवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये चेन्नईने मुंबईचा 20 रन्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ गेली. तब्बत 12 वर्षानंतर रोहित शर्माने आयपीएलमध्ये शतक ठोकलं. दरम्यान सामन्यानंतर रोहित शर्माचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये रोहित शर्मा अगदी हताश होऊन ड्रेसिंग रूममध्ये जात होता. 

रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा एकटाच निराशेने ड्रेसिंग रुमकडे जाताना दिसत होता. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मॅच संपल्यानंतर दोन्ही टीमचे खेळाडू एकमेकांशी हात मिळवतायत. मात्र दुसरीकडे रोहित शर्मा अत्यंत निराश होऊन मान खाली घालून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता.

रोहित शर्मा एकटा पडलाय का?

चेन्नई सुपर किंग्ज विरूद्धच्या सामन्यात जीव तोडून खेळल्यानंतरही टीमच्या हाती पराभवच लागला. यामुळे रोहित शर्मा प्रचंड नाराज दिसून आला. या व्हिडीओमध्ये रोहित विरूद्ध टीमच्या खेळाडूंशी हात मिळवताना दिसला नाही. याशिवाय तो ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना तो एकटा जाताना दिसला. हार्दिक पंड्याशी असलेला कथित वाद आणि टीमचा पराभव यामुळे रोहित शर्मा कुठेतरी एकटा पडल्याचं म्हटलं जातंय.

आयपीएल 2024 मधील 6 सामन्यांमधील मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव आहे. यंदाच्या सिझनमध्ये वानखेडे स्टेडियमवरील त्यांचा पहिला पराभव आहे. या पराभवामुळे मुंबईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर घसरलीये. आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली एमआयच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशाही प्रत्येक सामन्यासह मावळताना दिसतेय. त्यामुळे आता आगामी सामन्यांमध्ये मुंबईची टीम प्लेऑफ गाठणार का प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 

चेन्नईकडून मुंबईच्या टीमचा पराभव

चेन्नई सुपर किंग्सने, मुंबई इंडियन्सच्या होम ग्राऊंडवर आपला विजय नोंदविला आहे. चेन्नईने मुंबईला 20 रन्सने पराभूत केलं. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 166 च्या स्ट्राइक रेटने धडाकेबाज फलंदाजी करत 105 धावांची नाबाद खेळी खेळली. रोहित शर्माच्या या खेळीमध्ये एकूण 11 चौकार आणि 5 षटकार सामील होते. मात्र रोहितची ही खेळी टीमला विजय मिळवून देऊ शकली नाही. रोहित वगळता टीममधील इतक कोणत्याही खेळाडूला चांगला खेळ करता आला नाही. दुसरीकडे या विजयासोबत सीएसके पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.