'हिटमॅन' अजूनही अनफिट? रोहित शर्माच्या हेल्थबाबत मोठी अपडेट

'हिटमॅन' अजूनही अनफिट? जाणून घ्या रोहित शर्माच्या दुखापतीबाबतची अपडेट

Updated: Jan 17, 2022, 07:41 PM IST
'हिटमॅन' अजूनही अनफिट? रोहित शर्माच्या हेल्थबाबत मोठी अपडेट title=

मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून रोहित शर्मा बाहेर झाला आहे. याचं कारण म्हणजे त्याला झालेली दुखापत. या दुखापतीमुळे रोहित शर्मा किती काळ अजून बाहेर राहणार याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. हिटमॅनची हेल्थ अपडेट आली आहे. 

ODI आणि T20 कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत आहे. हळूहळू तो रिकव्हर होत असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 वनडे आणि 3 T20 सामने होणार आहे. या सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा मैदानात उतरणार की नाही याची शंका होती. 

दक्षिण आफ्रिके विरुद्ध वन डे सामन्यात रोहित शर्मा खेळताना दिसणार नाही. मात्र वेस्ट इंडिज विरुद्ध सीरिजमध्ये मैदानात खेळताना दिसेल अशी माहिती मिळाली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध सीरिज 6 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार आलं होतं. रोहित शर्मा पूर्ण बरा न मिळाल्यामुळे वन डे सीरिजमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिेलेल्या माहितीनुसार वेस्ट इंडिज सीरिजपर्यंत रोहित बरा होऊन मैदानात उतरेल. 

फेब्रुवारीला होणार्‍या पहिल्या वनडेसाठी अजून 3 आठवडे बाकी आहेत. त्यामुळे या 3 आठवड्यात तो पूर्ण बरा होईल अशी अपेक्षा आहे. रोहितला बऱ्याच दिवसांपासून हॅमस्ट्रिंगचा त्रास आहे. याच त्रासामुळे 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी देखील त्याला संघातून बाहेर पडावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा हा त्रास सुरू झाला आहे. 

रोहित शर्माकडे वन डे आणि टी 20चं कर्णधारपद आहे. त्याचसोबत आता विराट कोहलीनं राजीनामा दिल्याने कसोटी क्रिकेटचं कर्णधारपदही हिटमॅनकडे येण्याची शक्यता आहे. तसे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत. मात्र अद्याप अधिकृत घोषणा होणं बाकी आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x