त्यांच्याच घरात विडिंजला धुतला, विजयानंतर भारतीय कॅप्टन थेट फॅन्समध्ये घुसला, Video व्हायरल

इंग्लंडविरूद्धची वनडे सिरीज जिंकल्यानंतर आता कर्णधार म्हणून रोहितने वेस्ट इंडिजविरूद्धची टी-20 सिरीजही भारताच्या नावे केलीये. त्यामुळे सध्या चाहते रोहित शर्मावर खूश आहेत.

Updated: Aug 7, 2022, 12:34 PM IST
त्यांच्याच घरात विडिंजला धुतला, विजयानंतर भारतीय कॅप्टन थेट फॅन्समध्ये घुसला, Video व्हायरल title=

फ्लोरिडा : विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर ही धुरा मुंबईचा स्टार खेळाडू रोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. कर्णधारपद हाती घेतल्यानंतर रोहित शर्माची विजयी घौडदौड सुरुच आहे. इंग्लंडविरूद्धची वनडे सिरीज जिंकल्यानंतर आता कर्णधार म्हणून रोहितने वेस्ट इंडिजविरूद्धची टी-20 सिरीजही भारताच्या नावे केलीये. त्यामुळे सध्या चाहते रोहित शर्मावर खूश आहेत.

शनिवारी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजला 59 रन्सने नमवून टीमने सिरीज काबिज केली. दरम्यान यावेळी केवळ सामना जिंकून नव्हे तर सामन्यानंतर केलेल्या एका कृत्यामुळे रोहित शर्माचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सामना संपल्यानंतर सर्व चाहते रोहितची एक झलक पाहण्यासाठी थांबले होते. यावेळी रोहित ड्रेसिंग रूममध्ये जात असताना त्याने थांबलेल्या फॅन्सकडे पाहिलं आणि हात उंचावून दाखवले. इतकंच नव्हे तर क्षणार्धात तो त्या सर्व फॅन्सजवळ गेला आणि त्यांना हाय-फाय दिले. 

रोहितच्या या कामगिरीची सगळीकडेच चर्चा होतेय. रोहितने हाय-फाय दिल्यानंतर चाहत्यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे झळकत होता. 

भारताने जिंकली सिरीज

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका धमाकेदार पद्धतीने जिंकलीये. भारताने चौथा T20 सामना 59 रन्सने जिंकला. वेस्ट इंडिजविरुद्धचा पाचवा टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. मालिका जिंकल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा बेंच स्ट्रेंथवर बसलेल्या अनेक खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे.