त्रिनिदाद : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका धमाकेदार पद्धतीने जिंकलीये. भारताने चौथा T20 सामना 59 रन्सने जिंकला. वेस्ट इंडिजविरुद्धचा पाचवा टी-20 सामना आज खेळवला जाणार आहे. मालिका जिंकल्यामुळे कर्णधार रोहित शर्मा बेंच स्ट्रेंथवर बसलेल्या अनेक खेळाडूंना संधी देण्याची शक्यता आहे. आशिया चषक डोळ्यासमोर ठेवून टीम इंडिया टी-20 मालिकेसाठी तयारी करतेय. अशा स्थितीत सर्व खेळाडूंना संधी मिळणे अत्यंत गरजेचं आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील चार सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने रोहित शर्मासोबत ओपनिंग केली. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवमुळे इशान किशनला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा स्थितीत पाचव्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा त्याला सलामीची संधी देऊ शकतो. तर तिसऱ्या क्रमांकासाठी दीपक हुड्डा मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
चौथ्या क्रमांकाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत मैदानात उतरणार हे नक्की. पंत हा तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा नंबर वन यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने जिंकवून दिले आहेत. संजू सॅमसनला पाचव्या क्रमांकावर आणखी एक संधी मिळू शकते संजूला वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात फक्त एकच संधी मिळाली आहे. त्याचबरोबर दिनेश कार्तिकला फिनिशरची भूमिका बजावण्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकतं.
भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी अर्शदीप सिंगला संधी दिली जाऊ शकते. अर्शदीप सिंगने दमदार कामगिरी करून सर्वांची मनं जिंकली आहेत. तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून आवेश खानला संधी मिळू शकते. फिरकीची जबाबदारी रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांच्याकडे सोपवली जाऊ शकते.
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, दीपक हुड्डा, संजू सैमसन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंह, रवि बिश्नोई आणि अक्षर पटेल.