Rohit Sharma: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज (IND vs SL ODI series) खेळवली जातेय. या सिरीजमधील शेवटचा सामना Greenfield International Stadium वर खेळवला जातोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय टीम इंडियासाठी खूप फायदेशीर ठरला. मात्र टीम इंडियाचा कर्णधार हिटमॅन चांगल्या लयीत दिसत होता, मात्र त्याचवेळी त्याने स्वतःची विकेट गमावली.
रोहित शर्माचं अवघ्या 8 रन्सने त्याचं अर्धशतक हुकलं. अर्धशतक जवळ असताना चमीका करुणारत्नेच्या गोलंदाजीवर कर्णधाराची विकेट गेली. यावेळी रोहित शर्माची विकेट गेल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
भारतीय क्रिकेट टीमचा नियमित कर्णधार रोहित शर्मा श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने आज टीम इंडियालाही चांगली सुरुवात करून दिली. त्याच्या आजच्या खेळीवरून तो शतक ठोकणार असं दिसत असतानाच 42 रन्सवर त्याची विकेट गेली. दरम्यान विकेट गेल्यानंतर रोहित शर्मा स्वतःवरच संतापलेला दिसला.
भारताच्या डावाची 16 वी ओव्हर सुरु होती. चमीका करुणारत्ने गोलंदाजी करत असताना रोहित शर्मा स्ट्राईकवर होता. चमीका करुणारत्नेने टाकलेल्या जाळ्यात रोहित शर्मा अडकला. पुल शॉट खेळण्याच्या नादात बाउंड्रीजवळ उभ्या असलेल्या अविष्का फर्नांडोकडे हिटमॅन कॅच देऊन बसला. अशामध्ये 2 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 42 रन्सवर रोहित शर्मा पव्हेलियनमध्ये परतला.
mistake pic.twitter.com/jF58DS8prh
— Saddam Ali (@SaddamAli7786) January 15, 2023
कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खराब फॉर्मशी झुंजताना दिसतोय. अशातच आजंही तो एक मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र श्रीलंकेविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या सिरीजमध्ये तो चांगल्या लयीत दिसून आला. पहिल्या सामन्यात त्याने 83 रन्सची उत्तम खेळी केली. मात्र त्याला शतक करता आलं नाही.