VIDEO: मैदानातच रोहित शर्माकडून चहलचा अपमान

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला.

Updated: Feb 4, 2019, 09:58 PM IST
VIDEO: मैदानातच रोहित शर्माकडून चहलचा अपमान title=

वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेमध्ये भारताचा विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ही सीरिज ४-१नं जिंकली. न्यूझीलंडमध्ये भारताला पहिल्यांदाच वनडे सीरिजमधल्या ४ मॅच जिंकता आल्या आहेत. या सीरिजच्या पहिल्या ३ मॅचसाठी विराट कोहली भारताचा कर्णधार होता, तर उरलेल्या २ वनडेसाठी रोहित शर्माकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेनंतर कर्णधार रोहित शर्मानं भारताचा स्पिनर युझवेंद्र चहलचा अपमान केला.

युझवेंद्र चहल हा त्याच्या 'चहल टीव्ही'च्या माध्यमातून भारतीय टीमच्या क्रिकेटपटूंशी गप्पा मारतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजपासून 'चहल टीव्ही'ची सुरुवात झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या वनडेनंतर युझवेंद्र चहल कर्णधार रोहित शर्माशी बोलत होता. विराट सध्या भारतीय टीममध्ये नाही, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करण्याची संधी मला मिळेल का? असा सवाल चहलनं रोहितला विचारला. तुझ्या या प्रश्नाबद्दल मी टीम व्यवस्थापनाशी चर्चा करीन. त्यांनी परवानगी दिली, तर तुला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात येईल, असं उत्तर रोहित शर्मानं दिलं.

रोहित शर्मा मात्र हे उत्तर देऊन शांत बसला नाही. यापुढे बोलताना रोहित भडकला आणि त्यानं चहलचा अपमान केला. भारतीय टीम बॅटिंगसाठी फक्त १० खेळाडूंचा विचार करते. अकराव्या खेळाडूचा आम्ही बॅटिंगसाठी विचार करत नाही. तू टीममधला अकरावा खेळाडू आहेस, असं रोहित म्हणाला. रोहितच्या या बोलण्यानंतर यावर चहलनंही प्रतिप्रश्न केला. रोहित तू सगळ्यांसमोर माझा अपमान का करत आहेस? असं चहल म्हणाला. 

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा ९२ रनवर ऑल आऊट झाला होता. त्यावेळी युझवेंद्र चहलनं सर्वाधिक नाबाद १८ रन केल्या होत्या.