रोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे

विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे.

Updated: Mar 14, 2018, 11:08 PM IST
रोहितचा विक्रम, युवराज सिंगला टाकलं मागे title=

कोलंबो : विराट कोहलीऐवजी भारतीय टीमचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला सूर गवसला आहे. बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये रोहित शर्मानं अर्धशतक केलं. रोहितनं ६१ बॉल्समध्ये ८९ रन्स केल्या. रोहितच्या या खेळीमध्ये ५ फोर आणि ५ सिक्सचा समावेश आहे. 

या मॅचमधल्या पाचव्या सिक्ससोबतच रोहित शर्मानं युवराज सिंगचं रेकॉर्ड मोडलं आहे. भारताकडून सर्वाधिक सिक्स लगावण्याचा विक्रम रोहितनं केला आहे. रोहितच्या टी-20मध्ये आता ७५ सिक्स आहेत. युवराज सिंगनं आत्तापर्यंत टी-20मध्ये ७४ सिक्स लगावल्या आहेत.

टी-20मध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारे भारतीय

रोहित शर्मा ७५

युवराज सिंग ७४

सुरेश रैना ५४

एमएस धोनी ४६

विराट कोहली ४१

रोहित शर्माचं आंतरराष्ट्री टी-20 मधलं हे १३वं अर्धशतक होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये शतक करण्याची संधी रोहितकडे होती पण तो अपयशी ठरला. रोहित शर्मा आणि सुरेश रैनानं या मॅचमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९ ओव्हरमध्ये १०० रन्सची पार्टनरशीप केली. याआधी रोहित आणि शिखर धवनमध्ये ७० रन्सची पार्टनरशीप झाली.

रोहित शर्मा या मॅचच्या शेवटच्या बॉलवर रन आऊट झाला. याचबरोबर टी-20मध्ये रन आऊट होणारा रोहित ५०वा भारतीय ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये ७ टीमनी हे रेकॉर्ड केलं आहे.