वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...

Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai : बार्बाडोसमधून टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह उड्डाण करताच आता रोहित शर्माने ट्विट करून भारतीयांना एक आवाहन केलंय. 

सौरभ तळेकर | Updated: Jul 3, 2024, 06:58 PM IST
वर्ल्ड कप जिंकताच Rohit Sharma ची मोठी घोषणा, ट्विट करत हिटमॅन म्हणाला...
Rohit Sharma Invited For Victory Parade in mumbai

Rohit Sharma invites India to join celebration : खराब वातावरणामुळे टीम इंडिया वर्ल्ड कप विजयानंतर देखील बार्बाडोसमध्ये अडकली होती. अशातच आता टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कप ट्रॉफीसह दिल्लीला रवाना झाली आहे. अशातच वर्ल्ड कपची ट्रॉफी भारतात येत असतानाच आता कॅप्टन रोहित शर्मा याने ट्विट करून मोठी घोषणा केली आहे. रोहित शर्माने संपूर्ण भारतीयांना आवाहन केलंय.

काय म्हणाला रोहित शर्मा? 

आम्ही तुमच्या सर्वांसोबत या खास क्षणाचा आनंद घेऊ इच्छितो, असं रोहित शर्माने म्हटलं आहे. तसेच 4 जुलै रोजी संध्याकाळी 5:00 वाजल्यापासून मरीन ड्राइव्ह आणि वानखेडे येथे विजय परेडमध्ये सामील होण्याचं आवाहन देखील रोहित शर्माने केलंय. विजय परेडसह हा विजय साजरा करूया, असं रोहित शर्मा म्हणतो. वर्ल्ड कपची ट्रॉफी घरी येतीये, असं म्हणत रोहितने सर्वांची उत्सुकता वाढवली आहे.

सकाळी 11 वाजता टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत, अशी माहिती बीसीसीआय सचिव राजीव शुक्ला यांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर टीम इंडिया ट्रॉफीसह मुंबईला रवाना होईल. मुंबईमध्ये संध्याकाळी 5 वाजता मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी भव्य रॅली निघणार आहे. तसेच बीसीसीआयचे सचिव जय शहा टीम इंडियाला जाहीर केलेली 125 कोटींची प्राईझ मनी वितरीत देखील करतील.

दरम्यान, तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियाने (Team India) दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup 2024) नाव कोरत इतिहास रचला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. गेल्या कित्येक वर्षापासून उराशी बाळगलेलं स्वप्न रोहित शर्माने पूर्ण केलंय. त्यामुळे आता मुंबईकर रोहित अँड कंपनीच्या स्वागताला कोणतीही कसर सोडणार नाही, हे मात्र नक्की..!

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x