मुंबई : आयपीएल 2022 च्या 26 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 200 रन्सचं आव्हान देण्यात आलं होतं. पुन्हा एकदा मुंबईच्या गोलंदाजांनची खराब कमागिरी समोर आली. यामध्येच केएल राहुलनेही त्याचं शतक पूर्ण केले. मात्र, टीमचे गोलंदाज मार खात असताना हिटमॅन चाहत्यांसोबत मस्ती करत होता.
रोहितचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो. ज्यामध्ये तो खोटा कॅच घेण्याचं काम करत असल्याचं दिसून येतंय. हे सर्व करून रोहित चाहत्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी पसंती दिली आहे. पण यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार टीकाही केली आहे.
ही घटना मुरुगन अश्विनच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर घडली. ज्यावेळी मनीष पांडेने कव्हरवर उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या दिशेने एक शॉट खेळला. पांडेने फटका मारल्यानंतर चेंडू रोहितच्या हातात गेला.
यावेळी रोहितने बॉल पकडताच तो उड्या मारत आनंद करू लागला. यादरम्यान चाहत्यांना वाटलं की, रोहित शर्माने तो कॅच पकडला आहे. मात्र यामध्ये टप्पा पडला असल्याचं सर्वांच्या फार नंतर लक्षात आलं. या सर्व घटनेनंतर रोहितही हसायला लागला.
@ImRo45 bluffs with the crowd.#MIvsLSG #RohitSharma pic.twitter.com/zoECyXFpCe
— Satyasadhan Mudly (@ImSatya5) April 16, 2022
मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्याच्या वेळी चाहत्यांचा हिरमोड होताना दिसतोय. यंदाचा सिझन हा मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्नच आहे. सहा सामने झाले असून एकाही सामन्यात मुंबईला विजय मिळवता आलेला नाही. काल झालेल्या लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धच्या सामन्यात 18 रन्सने पराभव झाल्याने हा मुंबईचा सलग सहावा पराभव ठरला आहे.