मुंबई : कालपासून आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात झाली आहे. पहिल्या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला. तर आता चाहत्यांची नजर दुसऱ्या सामन्यावर आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स असा रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच मुंबईच्या टीमला एक गूड न्यूज मिळाली आहे. टीममध्ये एका धाकड प्लेअरची एंट्री झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेअर सुर्यकुमार यादव खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह होतं. मात्र सूर्यकुमार यादव काल मुंबईच्या टीमसोबत आला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सविरूद्धचा पहिला सामना सूर्या खेळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या ट्विटरवरून एक व्हिडियो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीमसोबत जोडला असल्याचं दिसतंय. या व्हिडीयोमध्ये सूर्या मुंबईने यापूर्वी जिंकलेल्या ट्रॉफीजसोबत पोज देताना दिसतोय. मुंबईने आतापर्यंत 5 आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
एकच वादा, __!
बोला रे, Paltan! #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians@surya_14kumar MI TV pic.twitter.com/gP6izbPcxp
— Mumbai Indians (@mipaltan) March 26, 2022
सूर्यकुमार यादव वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T-20 सामन्यापासून बाहेर होता. या सामन्यामध्ये त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. यामुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं. यानंतर रिहॅबिलीटेशनसाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) होता.
दरम्यान सूर्यकुमारची प्लेईंग 11 मध्ये समावेश होणार असल्यास कर्णधार रोहित शर्माची चिंताही काहीशी कमी होणार आहे. सूर्या एक धडाकेबाज खेळाडू असून त्याच्या फलंदाजी उत्तम आहे. त्याने फलंदाजीच्या जोरावर मुंबईला अनेक सामने जिंकून दिले आहेत.