मुंबई : राजस्थान रॉयल्सचा स्पिनर युजवेंद्र चहलने मोठा कारनामा केला आहे. युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal Hat-trick) कोलकाता विरुद्धच्या सामन्यात एकाच ओव्हरमध्ये हॅट्रिकसह 4 विकेट्स घेतल्या आहेत. यासह चहल या मोसमात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. (rr vs kkr ipl 2022 rajsthan royals spinner yuzvendra chahal registered 1st hattrick in 15th season)
चहल आपल्या कोट्यातील चौथी आणि कोलकाताच्या डावातील 17 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर चहलने वेंकटेश अय्यरला विकेटकीपर आणि कॅप्टन संजू सॅमसनच्या हाती स्टंपिग आऊट केलं. त्यानंतर चहलने ओव्हरच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या बॉलवर सलग 3 विकेट्स घेत हॅट्रिक घेतली.
चहलने चौथ्या बॉलवर कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यरला 85 धावावर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यानंतर पुढील बॉलवर त्याने शिवम मावीला झिरोवर कॅच आऊट केलं. रियान परागने मावीचा कॅच घेतला. त्यानंतर आता हॅट्रिक बॉल होता. या हॅट्रिक बॉलवर चहलने आक्रमक फलंदाज पॅट कमिन्सलाही भोपळा फोडू दिला नाही.
चहलने फिरकीच्या जाळ्यात पॅटला फसवलं आणि पॅटने विकेटकीपर सॅमसनला कॅच दिला. यासह चहलने अफलातून हॅट्रिक घेतली. हॅट्रिक घेतल्यानंतर चहलच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा होता. तसेच चहलनेही मैदानात मुजरा पाहायला बसल्यासारखं रुबाबात सेलिब्रेशन केलं.चहलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 40 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.
चहलने घेतलली हॅट्रिक ही आयपीएलच्या इतिहासातील एकूण 21 वी हॅटट्रिक ठरली. तर चहलच्या आयपीएलमधील पहिलीवहिली हॅट्रिक ठरली.
कोलकाता नाइट राइडर्स प्लेइंग इलेव्हन :
एरॉन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कॅप्टन), नितीश राणा, आंद्रे रसल, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), सुनील नारायण, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती.
राजस्थान रॉयल्सची प्लेइंग इलेव्हन :
जॉस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कॅप्टन/विकेटकीपर), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मकॉए, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.
Special feat deserves special celebration!
Hat-trick hero @yuzi_chahal!
Follow the match https://t.co/f4zhSrBNHi#TATAIPL | #RRvKKR | @rajasthanroyals pic.twitter.com/NhAmkGdvxo
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2022