SA T20 League: Live सामन्यात असं काय झालं? आकाश चोपडाने मागितली सचिन तेंडूलकरची माफी!

SA T20 League sorry sachin: आर पी सिंहने किस्सा सांगितला. फॉलो-थ्रूमध्ये असं कधी घडलं नसेल, पण एकदा फलंदाजी करताना स्ट्रेट ड्राईव्ह मारला अन् 

Updated: Jan 20, 2023, 05:17 PM IST
SA T20 League: Live सामन्यात असं काय झालं? आकाश चोपडाने मागितली सचिन तेंडूलकरची माफी! title=
SA20,Aakash Chopra,RP Singh

Aakash Chopra, RP Singh, Sachin Tendulkar: क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. मिनी आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकन टी-20 लीगचा (SA T20 League) थरार पहायला मिळतोय. या स्पर्धेच्या पहिल्या मोसमात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे सामन्याचा रोमांच आणखी वाढल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता प्रिटोरिया कॅपिटल्स (Pretoria Capitals) आणि जोबर्ग सुपर किंग्ज (Joburg Super Kings) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात कॅपिटल्सचा फलंदाज थ्युनिस डी ब्रायन (theunis de bruyn) आगळ्या वेगळ्या रित्या बाद झाला. त्यावर कॉमेंट्रेर्सची चर्चा सुरू झाली. (sa20 sorry sachin paaji rp singh and aakash chopra apologize to sachin tendulkar know reason latest sports news)

सामन्याची पाचवी ओव्हर सुरू होती. त्यावेळी सॉल्ट (Solt) मैदानावर 6 चेंडूत 11 धावांवर खेळत होता. तर दुसऱ्या स्टाईकवर थ्युनिस डी ब्रायन (theunis de bruyn) नुकताच उतरला होता. कॅप्टनने पाचवी ओव्हर टाकण्याची जबाबदारी अलझारी जोसेफवर (Alzarri Joseph) सोपवली. पहिल्याच बॉलवर सॉल्ट स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला. सॉल्टचा शॉट वेगात सरळ दिशेने गेला आणि गोलंदाज अल्झारी जोसेफच्या पायाला लागला आणि चेंडू स्टंपला लागला.

बॉल स्टंपला लागल्याने पुढे आलेला थ्युनिस डी ब्रायन बाद झाला. ब्रायनला खातं देखील उघडता आलं नाही. ब्रायन बाद झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं. कॉमेंट्रेटर्समध्ये (commentators) चर्चा सुरू झाली. त्यावेळी आकाश चोपडा (Aakash Chopra) आणि आर पी सिंह (RP Singh) कॉमेंट्रीच्या मैदानात होते. या विकेटमागे कोणतं कौशल्य आहे ते सांग. गोलंदाज मंकडिंग (mankading) करतो तेव्हा सर्वत्र चर्चा सुरू होते. तो चेंडू पायावर आदळला आणि स्टंपला लागला, मला वाटत नाही की त्यात काही कौशल्य आहे, अशी चर्चा सुरू असताना आकाश चोप्राने आरपी सिंगला प्रश्न विचारला, 'तू कधी असं काही केलं आहे का?'

आणखी वाचा - मिस्ट्री गर्ल Kaviya Maran ला दक्षिण आफ्रिकेतून लग्नाची मागणी; LIVE सामन्यात असं काय झालं? पाहा VIDEO

त्यावेळी आर पी सिंहने किस्सा सांगितला. फॉलो-थ्रूमध्ये असं कधी घडलं नसेल, पण एकदा फलंदाजी करताना स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि समोरचा फलंदाज धावबाद झाला, असं आर पी म्हणाला. त्यावेळी मोठ्या आश्चर्याने आकाश चोप्राने विचारलं. कोण होता तो खेळाडू.. त्यावेळी मोठा श्वास रोखून आर पी म्हणाला 'सचिन तेंडूलकर' (Sachin Tendulkar)

पाहा Video - 

दरम्यान, सचिनचं नाव ऐकताच आकाश चोपडाने लगेच सिंहला माफी मागण्यास ( rp singh and aakash chopra apologize to sachin tendulkar) सांगितलं. अरे मी त्याचवेळी सचिनची माफी मागितली होती, असं आर पी सिंह म्हणाला. त्यावेळी आकाश चोपडाची रिअॅक्शन पाहण्याजोगी होती. आकाश चोपडाने ट्विट करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.