मुंबई : कशाचा आनंद कुणी कसा साजरा करावा, हे आनंदाच्या भरात कुणीच ठरवू शकत नाही. आजूबाजूच्यांना तर फक्त पाहत बसण्याशिवाय पर्याय नसतो. ज्यावेळी भारतात चेन्नई आणि दिल्लीच्या आयपीएल टीम समोरसमोर येऊन मैदानात लढत होत्या. याचवेळी दक्षिण आफ्रिकेत पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामना खेळताना आनंदाचा क्षण साजरा करण्याचा एक वेगळाच अंदाज दिसत होता...याला तुम्ही आनंदातला राडा म्हटलं तरी देखील चालेल असा हा मैदानात राडा सुरु होता. कुणालाच काहीच कळत नव्हतं हा कसा राडा आहे...शेवटी तो आनंदाचाच राडा होता.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम दरम्यान टी-२० सामना खेळण्यात आला. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज तबरेज शम्सी यांने पाकिस्तानच्या प्रत्येक बॅटसमनची जेव्हा जेव्हा विकेट काढली, भावाची स्टाईलच प्रेक्षकांना जास्त दिसली. तबरेज शम्सी म्हणजे तबरेज शम्सीने पायातला शूज काढला आणि फोनसारखा कानाला लावला.
कुणाला वाटलं भाऊ फोन लावून मित्रांना बोलवतोय की काय? पण आली लहर आणि केला कहर त्याप्रमाणे भाऊने पाकिस्तानची विकेट काढली की लावला फोन कानाला... काय पुटपुटला ते त्यालाच माहित...पण तुम्ही गल्लीबोळात राडा झाला आणि कुणी एकटाच सापडल्यावर जसा मित्रांना फोन करून बोलवतो तशीच ही तबरेजची स्टाईल आहे. फोटो पाहून असंच वाटतं शम्सीभाऊ कानाला शूज लावून क्रिकेटच्या मैदानातून थेट गल्लीतल्या मित्रांना फोन...भाऊ सर्वांना घेऊन ये...मी एकटाच आहे इकडे...लवकर ये नाहीतर. पण असं नव्हतं ही त्याची स्टाईल होती.
कोण आपला आनंद कसा साजरा करेल हे सांगता येत नाही, शम्सी आपला आनंद हा क्रिकेटच्या मैदानात पायतला शूज कानाला लावून फोन लावल्यासारखा करतो आणि पुटपुटतो, ही त्यांची आनंद साजरा करण्याची स्टाईल आहे.
Hafeez gone for 13 in his 100th T20I and Shamsi wrote another wicket on his shoe. This guy is alrwady pissing me off. Fitte mun Hafeez tere te #PAKvSA pic.twitter.com/PW6uBybf7G
— Daniyal Mirza (@Danitweets__) April 10, 2021
दहाव्या ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या फखर जमाची विकेट शम्सीने काढली आणि त्यानंतर १४ व्या ओव्हरमध्ये मोहम्मद हाफीजलाही बाद केलं, यानंतर शम्सीने शूज कानाला लावला आणि आपला आनंद साजरा केला. क्रिकेटच्या क्रीजवर उभा असलेला सामन्याचा हिरो आणि पाकिस्तानचा बॅटसमन मोहम्मद रिझवान याला हे खटकलं त्याने शम्सीला असं करू नको, म्हणून समजावलं, पण तो कुणाचं ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हताच.
तबरेज शम्सीची ही अनोखी स्टाईलपाहून दक्षिण आफ्रिका टीमचे इतर सदस्य हैराण तर झालेच, पण त्यांनी देखील शम्सीला पूर्ण साथ दिली. एवढंच काय तर ते त्याचा हा अनोखा आनंद साजरा करण्याच्या कार्यक्रमात तेवढ्या पुरता का असेना सहभागी झाले.. एकदा तर शम्सीची गंमत करण्यासाठी, तबरेज शूज काढून आपला आनंद व्यक्त करत होता, आणि दुसरा शूज त्याच्या टीम मेंबर्सनी लपवून दिला.
शम्सीने पाकिस्तान विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात ४ ओव्हरमध्ये २९ रन्स देऊन २ विकेट घेतल्या, शम्सीने आपल्या शूजसह आनंद व्यक्त केला असला तरी विजय मिळवून देऊ शकला नाही.