Sachin Tendulkar vs Virat Kohli: विराटपुढे सचिनही फिका? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा

Sachin Tendulkar vs Virat Kohli: सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी नावे आहेत. या दोघांची नेहमी तुलना केली जाते. यावर पाहा ऑस्ट्रेलिया टेस्ट संघाच्या कर्णधाराने काय उत्तर दिले... 

Updated: Jan 23, 2023, 09:47 AM IST
Sachin Tendulkar vs Virat Kohli: विराटपुढे सचिनही फिका? ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा title=

Sachin Tendulkar vs Virat Kohli: भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा होते की सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यापैकी सर्वोत्तम फलंदाज कोण आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजही अधिकतर विक्रम सचिनच्या नावावर आहे. तर दुसरीकडे बाजूला विराट कोहलीने देखील शानदार कामगिरी करून सचिनच्या अनेक विक्रमांच्या जवळ पोहोचला आहे. सचिन तेंडुलकरच्या 100 शतरांचा विक्रम विराट कोहलीच मोडू शकतो असे म्हटले जाते.  

या दोन्ही क्रिकेटपटूंच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केवळ क्रिकेट चाहते नाही तर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक यांच्यात देखील चर्चा होत असते. सचिनच्या नावावर 49 शतके आहेत तर विराटने आतापर्यंत 46 शतके पूर्ण केले आहेत. लवकरच विराट कोहली (Virat Kohli) हा विक्रम करेल अशी चर्चा सर्वत्र आहे. मात्र अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील डॉक्युमेंट्री दरम्यान ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनेला विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी पॅट कमिन्सने दिलेले उत्तर ऐकूण सर्वच थक्क झाले. 

वाचा: आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा; गाडीची टाकी भरण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

 कमिन्सनचे रोचक उत्तर  

ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही (Pat Cummins) विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीबद्दल बोलले आहे. त्यावेळी कमिन्सन म्हणाला की, माझ्या मते विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे. कारण सचिन तेंडुलकरसोबत एकदाच t20 सामना खेळला आहे तोही खूप वर्षांपूर्वी... त्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाला प्रश्न विचारण्यात आला, भारताच्या फलंदाजीच्या क्रमवारीतील पहिल्या 4 क्रमांकांसाठी नावे निवडायची असतील तर तुम्ही कोणाची निवड कराल?

यावर उस्मान ख्वाजाने उत्तर दिले की, सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर असेल, त्यानंतर राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर, सौरव गांगुली तिसऱ्या आणि व्हीव्हीएस लक्ष्मण चौथ्या क्रमांकावर असेल. कारण या चौघांची फलंदाजी पाहणे हा एक अद्भुत अनुभव आहे. कमिन्सने त्याला विचारले की, जर तुम्हाला ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश करायचा असेल तर तुम्ही कोणाचा समावेश कराल. यावर ख्वाजाने विराट कोहली आणि ऋषभ पंत असे उत्तर दिले.