कुस्तीपटू हत्या प्रकरणात यूक्रेनच्या महिलेमुळे नवा ट्वीस्ट, क्राइम ब्रांचचा मोठा खुलासा

ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारला ताब्यात घेतल्यानंतर आता तपासाची चक्र फिरली 

Updated: Jun 15, 2021, 01:09 PM IST
कुस्तीपटू हत्या प्रकरणात यूक्रेनच्या महिलेमुळे नवा ट्वीस्ट, क्राइम ब्रांचचा मोठा खुलासा

मुंबई: ज्युनियर कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी सुशील कुमारला ताब्यात घेतल्यानंतर आता तपासाची चक्र फिरली आहेत. तपासात अनेक नवीन अपडेट्स येत असतानाच आता धक्कादायक ट्वीस्ट समोर आला आणि सगळेच चक्रावले. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने यासंदर्भात खुलासा केला. या हत्या प्रकरणात एका युक्रेनच्या महिलेचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. 

कोण आहे ही महिला सागर धनखड हत्या प्रकऱणात तिचं कनेक्शन काय?

दिल्ली पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. सागर धनखड हत्या प्रकरणात युक्रेनच्या महिलेचं कनेक्शन असण्याची शक्यता वर्तवली आहे. युक्रेनमध्ये राहणारी महिला सोनू महालची गर्लफ्रेंड असल्याचं सांगितलं जात आहे. सोनू महाल दिल्लीचा कुख्यात गुंड काला जठेड़ीचा नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. मात्र त्याच्या विरोधात अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

एका  सेल्फीनं जीव गेला?

मॉडल टाउन स्थित सागर धनखड़च्या फ्लॅटवर काही दिवसांपूर्वी सुशील कुमारचा खास अजय कुमार गेला होता. तेव्हा सागर आणि सोनू तिथे नव्हते. त्यावेळी अजयने युक्रेनच्या महिलेसोबत सेल्फी काढला. त्यांनतर तो तिथुन निघून गेला. याची भनक देखील या दोघांना सुरुवातीला नव्हती. 

एका फोटोनं पडली वादाची ठिणगी...

क्राइम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती सोनूला जेव्हा कळली तेव्हा त्याने फोन करून अजयला खूप शिवीगाळ केली. त्यामुळे हे वादाचं कारण ठरलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रागातून सोनू महाल आणि सागर धनखडला बेदम मारहाण करण्यात आली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.