जकार्ता : इंडोनेशिया मास्टर्सच्या क्वार्टर फायनल शुक्रवारी झाली.
यामध्ये भारताच्या 2 स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल आणि पी वी सिंधू यांच्यात सामना रंगला. सायनाने पी वी सिंधूला सरळ सेटमध्येच हरवलं. सिंधला 21 - 13, 21 - 19 मध्ये हरवलं. आणि सायनाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
पहिल्या सेटमध्ये सायनाने अगदी सहज विजय मिळवला. मात्र दुसऱ्या सेटमध्ये दोघीत चांगला खेळ पाहायला मिळाला. एकदा तर सिंधूने 7-3 ने लीड घेतली. मात्र सायनाने वापसी करत अखेर विजय मिळवला.
Saina Nehwal beats PV Sindhu 21-13, 21-19 to enter semi finals of women singles #IndonesiaMasters
— ANI (@ANI) January 26, 2018
या अगोदर दोन्ही ऑल्मपिक पदक विजेत्यांमध्ये गुरूवारी सामना रंगला. सिंधूने महिला एकेरी वर्गाच्या दुसऱ्या टप्यात मलेशियाच्या जो जिन वेईला मात दिली. वर्ल्ड नंबर 3 असलेली भारतीय खेळाडू सिंधूने 31 मिनिटांत हा खेळ 21-13, 21-19 असा आठ मिनिटांत संपवला.