जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या जोहानिसबर्ग खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
यामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या साक्षी मलिकने सुवर्ण पदक जिंकून देशाचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. साक्षीने न्यूझीलँडच्या तायला तुअहिने फोर्डला महिलांच्या फ्रीस्टाइल प्रतियोगिताच्या ६२ किलो वजनाच्या वर्गात मजल मारली आहे. साक्षीने १३ - २ अशी चांगली टक्कर दिली.
Got gold in commonwealth championship South Africa pic.twitter.com/LNTox9PF2F
— Sakshi Malik (@SakshiMalik) December 17, 2017
सुशील कुमार या भारतीय कुस्तीपटूची 'कम्पेटेटीव्ह रेसलिंग'मध्ये पुनरागमन झालं आहे. सुशीलचे हे पुनरागमन 'गोल्डन' कमाई ठरली आहे. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुशील कुमारने मान उंचावली आहे.
मेरे प्यारे देशवासियों का मेरे लिये बधाई संदेशों का बहुत बहुत धन्यवाद। आप के प्यार की वजह से ये संभव हो पाया है। आप लोग अपना प्यार व आशीर्वाद बनाये रखना। pic.twitter.com/8CnxK4sHfw
— Sushil Kumar (@WrestlerSushil) December 18, 2017
गोल्डन कामगिरी -
कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये 74 वजनी फ्री स्टाईल गटात सुशील कुमारने सुवर्णपदक कमावले आहे. ८-० अशी दमदार कामगिरी करत सुशीलने हे सुवर्णपदक कमावले आहे.