महेंद्रसिंग धोनीचे चाहते आहेत सलमान आणि त्याचे वडील

जगभरात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बरेच चाहते आहेत. धोनीने क्रिकेटविश्वास एक मजबूत ओळख निर्माण केलीये. 

Updated: Jun 7, 2018, 08:50 PM IST
महेंद्रसिंग धोनीचे चाहते आहेत सलमान आणि त्याचे वडील title=

मुंबई : जगभरात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे बरेच चाहते आहेत. धोनीने क्रिकेटविश्वास एक मजबूत ओळख निर्माण केलीये. त्याच्या चाहत्यांच्या यादीत अनेक बॉलीवूड अभिनेते. यातील एक म्हणजे सलमान खान. केवळ सलमान खानच नव्हे तर सलमान खानचे वडिल सलीम खानही धोनीचे मोठे फॅन आहेत. खुद्द सलमान खानने 'दस का दम' या शोमध्ये हा खुलासा केला. याआधी सलमान आणि धोनीच्या जवळीकीची अनेक उदाहरणे पाहिली आहेत. जेव्हा सलमानचा सुल्तान हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा सलमानने धोनीला पत्नी साक्षीसह आपल्या घरी बोलावले होते. याशिवाय अनेकवेळेस धोनी सलमानच्या घरी दिसला. 

मैदानावर तणावाचे वातावरण असताना धोनीच्या सकारात्मक आणि थंड स्वभावामुळे सलमान खान त्याचा चाहता आहे. सलमानने आपल्या दस का दम या शोमध्ये म्हटले, माझे वडिल या ३६ वर्षीय क्रिकेटरचे मोठे चाहते आहेत. खरंतर या शोमध्ये असा प्रश्न होता की किती टक्के भारतीय कपिल देव, सौरव गांगुली, विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यापैकी कोणाला चांगला कर्णधार मानतात.

यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, माझ्या वडिलांच्या मते महेंद्रसिंग धोनी आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे. थंड स्वभाव आणि सकारात्मक उर्जा त्याच्यात भरलेली आहे. अतिउत्साहाने तो कोणतीही गोष्ट करत नाही. क्रिकेट हा जेंटलमनचा गेम समजला जातो. धोनीने क्रिकेटबद्दलची ही भावना अद्याप जिवंत ठेवलीये. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सलमान खानच्या बर्थडे पार्टीत धोनी त्याच्या घरी दिसला होता.