या खेळातही ख्रिस गेल जबरदस्त!

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलचा मैदानातील धडाका आपण अनेक वेळा बघितलाच आहे.

Updated: Jun 7, 2018, 05:51 PM IST
या खेळातही ख्रिस गेल जबरदस्त! title=

मुंबई : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलचा मैदानातील धडाका आपण अनेक वेळा बघितलाच आहे. क्रिकेटच्या मैदानात बॅटिंग करताना ख्रिस गेल बॉलरचं अक्षरश: जगणं मुश्कील करतो. पण ख्रिस गेल हा फक्त क्रिकेटच नाही तर नेमबाजीमध्येही निपुण आहे. गेलनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेमबाजीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गेलच्या हातात एक बंदूक असून तो मशिमधून येत असलेलं लक्ष्य हवेत भेदत असल्याचं दिसत आहे.

 

#TopShotta #Smoking #DoubleBang #GoodFun

A post shared by KingGayle (@chrisgayle333) on

आयपीएल संपवून ख्रिस गेल नुकताच मायदेशी परतला आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर गेलचा फॉर्म ढासळला. यंदाच्या वर्षी ख्रिस गेल पंजाबच्या टीमकडून खेळला. ख्रिस गेल फॉर्ममध्ये असताना पंजाबची टीम पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर होती. पण गेलचा फॉर्म गेल्यानंतर मात्र पंजाबला चमकदार कामगिरी करता आली नाही. पंजाबची टीम यावर्षी सातव्या क्रमांकावर राहिली.