सानिया मिर्झा पुनरागमनसाठी सज्ज; पुन्हा टेनिसच्या कोर्टात उतरणार

सानियाने कपिल शर्मा शोमधून ती पुन्हा खेळणार असल्याचे सांगितले होते.

Updated: Mar 13, 2019, 10:42 AM IST
 सानिया मिर्झा पुनरागमनसाठी सज्ज; पुन्हा टेनिसच्या कोर्टात उतरणार

नवी दिल्ली : टेनिसपटू सानिया मिर्जा अनेक दिवसांनंतर पुन्हा एकदा टेनिस कोर्टमध्ये पाहायला मिळणार आहे. गरोदरपणामुळे टेनिस कोर्टपासून दूर असलेली सानिया लवकरच एका आतंरराष्ट्रीय स्पर्धेतून पुन्हा एकदा पदापर्ण करणार आहे. आगामी स्पर्धेला लक्ष करत सानियाने नेट प्रॅक्टिस सुरू केली आहे. सानियाच्या प्रॅक्टिसचा एका व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सानियाने मुलाला जन्म दिल्यानंतर पहिल्यांदाच टेनिस कोर्टमध्ये प्रॅक्टिस केली आणि प्रॅक्टिसचा हा व्हिडिओ तीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्जा तिच्या गरोदरपणामुळे टेनिसपासून लांब होती. परंतु आता पुन्हा एकदा ती कमबॅक करणार आहे. काही दिवसांपूर्वी सानियाने कपिल शर्मा शोमधून ती पुन्हा खेळणार असल्याचे सांगितले होते. वर्षाच्या शेवटी ग्रॅन्डस्लॅम अमेरिकी ओपनमधून पुन्हा खेळणार असल्याचे तिने कपिलच्या शोमध्ये सांगितले होते. ग्रॅन्डस्लॅम अमेरिकी ओपन यावर्षी सप्टेंबर महिन्यात खेळली जाणार आहे. 

ग्रॅन्डस्लॅम अमेरिकी ओपन स्पर्धेसाठी सानियाने प्रॅक्टिस सुरू केली आहे. सानियाच्या प्रॅक्टिस व्हिडिओनंतर तिच्या चाहत्यांकडून अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी १२ एप्रिल २०१० मध्ये लग्न केले. ३० ऑक्टोबर २०१८ रोजी सानियाने एका मुलाला जन्म दिला. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न केल्याने तिच्यावर अनेक प्रकारच्या टीकांचा सामनाही करावा लागला होता.