पणजी : भारताची टेनिस खेळाडू सानिया मिर्झा आणि तिचा क्रिकेटर पती शोएब मलिकला एक मुलगी हवीए. जेव्हा ते परिवार वाढविण्याचा विचार करतील तेव्हा बाळाचे नाव आडनाव मिर्झा मलिक असणार आहे. सानियाने 'गोवा फेस्ट २०१८' मध्ये लैंगिक भेदभाववरील एका कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली. 'मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतेय, माझा नवरा आणि मी ठरवलय की आमच्या बाळाचं आडनाव हे मिर्झा मलिक असेल. आम्हाला एक मुलगी हवीए.' असे सानियाने यावेळी सांगितले.
'आम्हाला मुलगा व्हावा कारण घराण्याच नाव पुढे नेईल असं तिच्या नात्यातील काहींना वाटतय' असं सांगत तिने लैंगिक भेदभावाविषयी सानियाने आपला अनुभव शेअर केला.
When my dad taught the world with his actions that having two daughters is more than ENOUGH and a blessing like no other and that you don’t need a boy to bring pride and laurels to your family #everygirlcan pic.twitter.com/d5Ix8ofs61
— Sania Mirza (@MirzaSania) April 3, 2018
Honored to receive the #Zeefairplayaward by none other than @smritiirani in Delhi last night pic.twitter.com/nD7cnCQl3q
— Sania Mirza (@MirzaSania) March 22, 2018
आम्ही दोन्ही बहिणी आहोत आणि आम्हाला भाऊ हवाय अस कधी वाटल नाही. आमचे नातेवाईक तस काही म्हटले तर आम्ही त्यांच्याशी भांडायचो. मी लग्नानंतर आडनाव बदलल नाही. भारताची टेनिस स्टार सानियाने १२ एप्रिल २०१० ला पाकचा माजी खेळाडू शोएब मलिकशी विवाह केला.