Sania Shoaib Divorce : घटस्फोटावर शोएब नं दिला दुजोरा? क्रिकेटरची 'ती' पोस्ट व्हायरल

Sania Mirza Shoaib Malik Divorce Contraversy : Shoaib Malik नं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Updated: Nov 14, 2022, 04:34 PM IST
Sania Shoaib Divorce : घटस्फोटावर शोएब नं दिला दुजोरा? क्रिकेटरची 'ती' पोस्ट व्हायरल title=

Sania Mirza and Shoaib Malik Divorce Rumors : भारतीय महिला टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) दोघेही घटस्फोटामुळे चर्चेत आले आहेत. सगळीकडे सानिया आणि शोएबने घटस्फोट (Sania Mirza and Shoaib Malik Divorce) घेतल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. मात्र, यावर सानिया किंवा शोएबनं प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर त्या दोघांच्या जुन्या रिलेशनशिप देखील चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, या सगळ्यात आता चर्चा सुरु आहे ती काही दिवसांपूर्वी शोएबनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टची. त्या पोस्टमध्ये शोएबनं दिलेल्या कॅप्शननं त्यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांना दुजोरा दिल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. 

हेही वाचा : Sania Mirza and Shoaib Malik: घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सानिया मिर्झा आणि शोएबचा 'तो' फोटो व्हायरल

शोएबनं त्याचा मुलगा इझानच्या वाढदिवसानिमित्तानं 30 ऑक्टोबर रोजी एक पोस्ट शेअर केली होती. यावेळी शोएबनं सानिया, इझान आणि त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत 'जेव्हा तुमचा जन्म झाला, तेव्हा आम्ही अधिक नम्र झालो आणि आमच्यासाठी हे आयुष्य खूप खास होतं. आपण कदाचित एकत्र नाही आणि रोज भेटत पण नसू पण बाबा प्रत्येक सेकंदाला तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करत असतो. तुझ्या सगळ्या इच्छा अल्लाह पूर्म करो. बाबा आणि आई तुझ्यावर खूप प्रेम करतात.'

पाहा शोएबची पोस्ट -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शोएबनं या पोस्टमध्ये म्हटलेल्या 'आपण एकत्र नाही आणि रोज भेटत पण नसू पण बाबा प्रत्येक सेकंदाला तुझा आणि तुझ्या हसण्याचा विचार करत असतो.' या वाक्यावरून त्यांचा कधीच घटस्फोट झाल्याचे अनेक नेटकरी म्हणत आहेत.  या शिवाय उर्दूफ्लिक्स नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटनं 'द मिर्झा मलिक शो'चे पोस्टर शेअर केले आहे. खरंतर शोएब किंवा सानियानं हे पोस्टर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही शेअर केलं नाही. त्यामुळे त्यांचा नक्कीच घटस्फोट झाला आहे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. (Sania Mirza Shoaib Malik Celebrate son Izhaan Birthday together pakistani cricketer Share emotional post gave hint about divorce) 

हेही वाचा : 'या' मॉडेलमुळे Sania Mirza- Shoaib Malik चा तलाक? तिच्यासोबतचा Intimate Photo viral

सानियाच्या नवऱ्याचे पाकिस्तानी अभिनेत्रीसह फोटोशूट

साधारण वर्षभरापूर्वी शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री आयेशा ओमरसोबत ( Model Ayesha Omar ) फोटोशूट केले होते. स्विमिंगपूलमध्ये काढण्यात आलेले बोल्ड आणि हॉट फोटो आयेशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले होते. एका लोकल मॅग्जीनच्या कव्हरपेजसाठी या दोघांनी हे फोटोशूट केले होते. आयेशाने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.