सानिया मिर्झाच्या बहिणीचा ही झाला होता तलाक, आता या क्रिकेटरची आहे सून

sania mirza sister : सानिया मिर्झाच्या बहिण ही युट्युबर आणि फॅनश डिझायनर आहे.

Updated: Nov 10, 2022, 11:42 PM IST
सानिया मिर्झाच्या बहिणीचा ही झाला होता तलाक, आता या क्रिकेटरची आहे सून title=

मुंबई : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा तलाक होणार असल्याच्या सध्या चर्चा आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पुढे येत आहेत. पण मिर्झा घराण्यात असं काही पहिल्यांदा घडत नाहीये. कारण याआधी सानियाची बहीण (sania mirza sister) अनम मिर्झा (anam mirza) हिचा देखील घटस्फोट झाला होता. मात्र आता तिने दुसे लग्न केले असून तो तिच्या वैवाहिक जीवनात सुखी आहेत.

सानिया मिर्झाचे स्टायलिश कपडे तिची धाकटी बहीण अनम मिर्झा (anam mirza) हीच डिझाइन करते. सानिया मिर्झाची धाकटी बहीण अनम मिर्झा फॅशन डिझायनर आहे. ती एक फॅशन आउटलेट देखील चालवते. अनम मिर्झा डिझायनर असण्यासोबतच युट्युबर देखील आहे.

अनम तिच्या यूट्यूब चॅनलवर तिच्या आणि सानियाच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असते. पण तिचे वैयक्तिक आयुष्यही अनेक वेळा वादात अडकले आहेत. तिचा पहिल्या पतीसोबत तलाक झालाय.
 
अनम मिर्झा हिचे पहिलं लग्न 2018 बिझनेसमन अकबर रशीदसोबत झाले होते. या लग्नाला सलमान खान, अर्जुन कपूर सारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. पण हे नातं फक्त 2 वर्ष टिकले. पण त्यांचा तलाक का झाला याचं कारण कळालं नाही.

तलाक झाल्यानंतर अनमच्या आयुष्यात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा (Mohammad Azharuddin) मुलगा मोहम्मद असदुद्दीनची एन्ट्री झाली. एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये विवाह केला. त्यांच्या लग्नाला आता तीन वर्षे झाले आहेत.