Sara Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar ) मुलगी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल ( Shubman Gill ) सोबतच्या अफेयरच्या चर्चामुळे ती चर्चेत आहे. सारा ( Sara Tendulkar ) आणि शुभमन ( Shubman Gill ) एकमेकांना डेट करत असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान सारा सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. अशातच तिने एक फोटो पोस्ट केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये असेलला व्यक्ती कोण असा सवाल करण्यात येतोय.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar ) मुलगी सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत असते. सध्या सारा सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी केनियामध्ये गेलीये. यावेळी तिचा एका व्यक्तीसोबतचा फोटो व्हायरल झालाय.
केनियाच्या ट्रिपचा आनंद घेत असताना तिने जंगलातील काही फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केलेत. सारा तेंडुलकर केनियातील एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली. सारासोबत जंगलात एका अनोळखी व्यक्तीला पाहिल्यानंतर शुभमन गिलचे चाहते चांगलेच संतापले.
सारासोबत ( Sara Tendulkar ) फोटोमध्ये हा मिस्ट्री मॅन दिसल्यानंतर चाहत्यांनी सारा शुभमन गिलला सोडून दुसऱ्या कोणाला तरी डेट करत असल्याचा अंदाज लावला. मात्र यामध्ये कोणतंही तथ्य नाही. साराने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती मूळची केनियाची आहे.
साराने ( Sara Tendulkar ) इन्स्टावर फोटो टाकताच ते व्हायरल झालेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये साराने लिहिलंय की, "आज पोस्ट करावी की नाही याचा विचार करत होतो, पण मसाईमध्ये आल्यानंतर मी योग्य निर्णय घेतला." यापूर्वी केनियातील इशारा नावाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतरही साराने तिचे काही फोटो पोस्ट केलेत. यामध्ये तिने एका स्थानिक व्यक्तीसोबत फोटो शेअर केलाय.
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून शुभमन गिल ( Shubman Gill ) आणि सारा तेंडुलकर ( Sara Tendulkar ) यांच्यात अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. परंतु दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.