धोनीच्या स्टाईलमुळे पाकच्या खेळाडूला जन्माची अद्दल

सरफराजने एक चेंडू परतवून लावताना स्टंपींगपासून वाचण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न नक्कीच चांगला होता. मात्र, या प्रयत्नात त्याला आपली विकेट मात्र, मुळीच टिकवता आली नाही.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 23, 2018, 06:20 PM IST
धोनीच्या स्टाईलमुळे पाकच्या खेळाडूला जन्माची अद्दल title=

नवी दिल्ली: एखाद्याच्या स्टाईलने प्रभावीत होणे एक वेळ ठिक. पण, ती स्टाईल जशीच्या तशी कॉपी करणे वाईट. कारण, त्यात अस्सलतेचा अंश मुळीच असत नाही. खेळाच्या बाबतीत त्यातही क्रिकेटच्या बाबतीत हे कैक पटीने वास्तव. या वास्तवतेची प्रचिती नुकतीच एका पाकिस्तानी खेळाडूला आली. विशेष असे की, हा खेळाडू पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार असून, तो भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनीची स्टाईल मारत होता. स्टाईल कसली कॉपीच होती ती. कॉपी करणे त्याला चांगलेच महागात पडले. इतके की, त्याला जन्माची अद्दल घडली.

टी-२०: पाकिस्तान केवळ १०५ धावांवर बाद

घटना आहे सोमवारची. टीम साऊथीच्या शानदार चेडूफेकीच्या जोरावर न्यूजीलंडच्या क्रिकेट टीमने पहिल्या टीम-२०मध्ये पाकिस्तानला ७ विकेटने पराभूत केले. वेस्टपेक स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक पराभूत झाल्यामुले पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची कामगिरी अवघ्या १०५ धावांवर आटोपली. 

प्रयत्न चांगला, पण विकेट वाचली नाही

याच सामन्यात केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार सरफराज अहमत सोशल मीडियावर टवाळीचा विषय ठरला. सरफराजचे आउट होणे हा या टवाळीचा विषय. सरफराजने एक चेंडू परतवून लावताना स्टंपींगपासून वाचण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न नक्कीच चांगला होता. मात्र, या प्रयत्नात त्याला आपली विकेट मात्र, मुळीच टिकवता आली नाही.

धोनीच्या स्टाईलची कॉपी आली अंगाशी

सरफराजने विकेट टिकविण्यासाठी मारलेल्या स्टाईलचा फोटो न्यूजीलंडने आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर अपलोड केला. त्यानंतर सोशल मीडियात तो जोरदार ट्रोल झाला. सोशल मीडियात या फोटोवर अनेक प्रतिक्रीया आल्या. या प्रतिक्रीयेमध्ये सरफराजने धोनीची स्टाईल मारण्याचा प्रयत्न केला खरा. पण, त्या नादात तो फसला आणि त्याला जन्माची अद्दल घडली, असा सूर उमटला.