Vijay Hazare Trophy 2022 : विजय हजारे ट्रॉफी 2022 वर सौराष्ट्र संघाने (Saurashtra) नाव कोरले आहे. कर्णधार जयदेव उनाडकटच्या (jaydev unadcut) नेतृत्वाखाली संघाने ही कामगिरी करून दाखवली आहे. सौराष्ट्र संघाच्या विजयाचा शिल्पकार शेल्डन जॅक्सन (sheldon jackson) ठरला आहे. या विजयासह सौराष्ट्रने दुसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. (saurashtra team won vijay hazare trophy final 2022 against maharashtra sheldon jackson jaydev unadcut saurashtra vs maharashtra)
हे ही वाचा : Dwayne Bravo ची IPL मधून निवृत्ती,आता चेन्नईत 'या' भूमिकेत दिसणार
सौराष्ट्र (Saurashtra) संघाने टॉस जिंकत प्रथम फिल्डींगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्र संघ (Maharashtra Cricket) प्रथम फलंदाजीला उतरला होता. महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नव्हती. महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतूराज (Ruturaj Gaikwad) वगळता कोणत्याच खेळाडूंना मोठी धावसंख्या करता आली नव्हती.
ऋतुराजने (Ruturaj Gaikwad) 131 बॉलमध्ये 108 रन्स काढून शतकी खेळी केली होती. या खेळीत त्याने 7 फोर आणि 4 सिक्स लगावले आहेत. या शतकी खेळीच्या बळावर महाष्ट्राने 9 विकेट गमावून 248 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे सौराष्ट्र समोर 249 धावांचे आव्हान असणार आहे.
हे ही वाचा : Ruturaj Gaikwad ने रचला इतिहास, Vijay Hazare Trophy त मोठा रेकॉर्ड
महाराष्ट्राने (Maharashtra Cricket) दिलेल्या 248 आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या सौराष्ट्रची (Saurashtra) सुरुवात चांगली झाली नव्हती. सौराष्ट्रचा हार्विक देसाईचे अर्धशतक ठोकून आऊट झाला. यानंतर झटपट 3 विकेट पडले होते. त्यामुळे सौराष्ट्र बॅकफुटवर गेली होती. मात्र शेल्डन जॅक्सनने (sheldon jackson) एक बाजू धरली होती.आणि त्याने ही बाजू भक्कम करत सौराष्ट्रला विजय मिळवून दिला.
सौराष्ट्रच्या विजयाचा शिल्पकार शेल्डन जॅक्सन (sheldon jackson) ठरला आहे. त्याने 133 धावांची नाबाद खेळी करत महाराष्ट्राच्या हाता-तोंडातला विजय खेचून आणला होता. त्याला चिराग जानीची 30 धावांची साथ मिळाली होती.
हे ही वाचा : Ruturaj Gaikwad ची शतकांची हॅट्ट्रीक, सौराष्ट्र विरूद्ध खणखणीत शतक
दरम्यान कर्णधार जयदेव उनाडकटच्या (jaydev unadcut) नेतृत्वाखाली सौराष्ट्रने विजय हजारे ट्रॉफीवर (Vijay Hazare Trophy 2022) नाव कोरले आहे. सौराष्ट्रने दुसऱ्यांदा विजय हजारे ट्रॉफी उंचावली आहे.तर महाराष्ट्राच स्वप्न भंग झाले आहे.