मुंबई : कॉमवेल्थ गेम्स स्पर्धा सुरू आहे. भारतीय खेळाडू एकामागे एक मेडल्स जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत आहे. या स्पर्धेत जिंकलेल्या खेळाडूंचं कौतुक भारतीयांसह जगभरात होत आहे. आता भारताला उंच उडीसोबत स्क्वाशमध्येही पदक मिळालं आहे. स्क्वाशमध्ये पदक मिळवणारा हा खेळाडू पहिला असल्याची चर्चा आहे.
सौरव घोषालने कॉमनवेल्थ गेम्समध्ये स्क्वाश सिंगलसाठी भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. पदक जिंकल्यानंतर सौरव घोषाल भावुक झाला. कांस्यपदकाच्या लढतीत सौरव घोषालने इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपचा स्क्वाशमध्ये 3-0 ने पराभव केला.
That first medal is always special...
Saurav Ghosal, everyone. #B2022 | #IndiaAtB2022 | @SauravGhosal pic.twitter.com/Q7yjbO45fF
— Olympic Khel (@OlympicKhel) August 4, 2022
सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली आणि इंग्लंडच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. जागतिक क्रमवारीत १५व्या क्रमांकावर असलेल्या घोषालने जागतिक क्रमवारीत 24व्या क्रमांकाच्या खेळाडूवर 11-6, 11-1, 11-4 ने पराभव करून कांस्यपदक जिंकलं.
स्क्वाश सिंगलमध्ये भारताला हे पहिलं मेडल मिळालं आहे. त्यामुळे सौरव घोषाल भावुक झाला. जिंकल्यानंतर तो ढसाढसा रडू लागला. त्याच्यासाठी मैदानात टाळ्यांचा कडकडाट होत होता. मात्र त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.