Commonwealth Games 2022 | पदक जिंकत इतिहासात पहिल्यांदाच भारताची 'उंच उडी'

बर्मिंघम इथे कॉमनवेल्थ गेम्स सुरू आहे. या वर्षी भारताच्या शिरपेचात खेळाडूंनी मानाचा तुरा रोवला आहे. एकामागे एक पदक खेळाडू जिंकत आहेत. 

Updated: Aug 4, 2022, 01:08 PM IST
Commonwealth Games 2022 | पदक जिंकत इतिहासात पहिल्यांदाच भारताची 'उंच उडी' title=

मुंबई : बर्मिंघम इथे कॉमनवेल्थ गेम्स सुरू आहे. या वर्षी भारताच्या शिरपेचात खेळाडूंनी मानाचा तुरा रोवला आहे. एकामागे एक पदक खेळाडू जिंकत आहेत. मात्र एका खेळाडूनं चक्क इतिहास रचला आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला 10 पदकं मिळाली आहेत. तर एथलॅटिक्समध्ये पहिलं मेडल मिळालं आहे. 

भारताला या आधी उंच उडीसाठी कधीच पदक मिळालं नव्हतं. त्यामुळे या खेळाडूनं मोठी कामगिरी करत इतिहास रचला आहे. पुरुष गटात उंच उडीसाठी भारताकडून खेळताना तेजस्विन शंकरने पहिलं पदकं मिळवलं आहे. तेजस्वीन शंकरने बुधवारी कॉमनवेल्थ गेम्समध्ये अॅथलेटिक्स स्पर्धेत कांस्यपदक जिंकून खातं उघडलं. 

त्याने 2.22 मीटर उंच उडी मारली. देशासाठी उंचउडीमध्ये पदकं मिळवून देणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. अवघ्या 23 व्या वर्षी त्याने इतिहास रचला आहे. जगभरात त्याचं कौतुक होत आहे. 

CWG साठी निवडण्यात आलेल्या भारतीय अॅथलेटिक्स टीमच्या सुरुवातीला तेजस्वीन शंकरला सहभागी करण्यात आलं नव्हतं. मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यावर भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने त्याला बर्मिंगहॅमला पाठवलं. आता या खेळाडूने इतिहास रचला आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत एकूण 18 पदकं जिंकली आहेत. 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 7 कांस्यपदके जिंकली आहेत. संकेत सरगर हा बर्मिंगहॅम येथे पदक जिंकणारा पहिला भारतीय होता, त्याने पुरुषांच्या 55 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं.