पाहा हार्दिक पांड्याची नवी 'फॅमिली'

एका खास फोटोशुटच्या निमित्तानं....   

Updated: Jul 17, 2020, 03:30 PM IST
पाहा हार्दिक पांड्याची नवी 'फॅमिली'
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना व्हायरसमुळं लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण आपल्या परिनं हे दिवस व्यतीत करण्याच्या प्रयत्नांत आहे. कोणी आपलाच वेगळा असा विरंगुळाही शोधला आहे. क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासुद्धा या काळात एका नव्या जबाबदारी तयार होताना दिसत आहे. ही जबाब दारी म्हणजे कुटुंबात एका नव्या सदस्याच्या स्वागताची. 

काही महिन्यांपूर्वीत हार्दिकनं त्याच्या खासगी आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची बाब सर्वांसमोर आणली. नताशा स्टॅन्कोविक हिच्यासोबत आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगत त्यानं अनेकांनाच धक्का दिला. हार्दिकचं खासगी आयुष्य तसा अनेकांसाठी आकर्षणाचा विषय. त्यातच आता हार्दिक आणि नताशानं त्यांचं हे नातं एका वेगळ्या टप्प्प्यावर नेण्याचा निर्णय घेतला असून, आपल्या बाळाच्या स्वागतासाठीच ही जोडी सज्ज होत आहे. 

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरणाऱ्या याच जोडीनं आता एक सुरेख असं फोटोशूट करत या दरम्यानच्या काळात काही खास आठवणींचा खजिना तयार करण्यातं ठरवलं आहे. हार्दिकनं 'फॅमिली', असं लिहित नताशासोबतचा एक फोटो पोस्ट केला. 

 

फोटोमध्ये बेबी बम्पसह नताशा अतिशय सुंदर दिसत असून, हार्दिकही तिला शोभून दिसत आहे. या जोडीकडे असणारे तीन पळीव कुत्रेही फोटोमध्ये दिसत आहेत. जीवनाच्या अतिशय मह्त्त्वाच्या टप्प्यावर असताना, एका कुटंबाचीच झलक हार्दिकनं या पोस्टच्या निमित्तानं सर्वांच्या भेटीला आणली आहे.