सेरेना विल्यम्स बॉयफ्रेंड अॅलेक्सिसह अडकली विवाहबंधनात

टेनिस जगतातील प्रसिद्ध खेळाडू सेरेना विल्यम्स बॉयफ्रेंड अॅलेक्सिस ओहनियनशी विवाहबद्ध झालीये. 

Updated: Nov 17, 2017, 07:13 PM IST
सेरेना विल्यम्स बॉयफ्रेंड अॅलेक्सिसह अडकली विवाहबंधनात

मुंबई : टेनिस जगतातील प्रसिद्ध खेळाडू सेरेना विल्यम्स बॉयफ्रेंड अॅलेक्सिस ओहनियनशी विवाहबद्ध झालीये. अॅलेक्सिस रेडिटचा सहसंस्थापक आहे. या दोघांचे लग्न या वर्षातील हाय प्रोफाईल लग्न मानले जातेय.

या दोघांच्या लग्नात हॉलीवूड आणि क्रीडा जगतातील अनेक बड्या व्यक्तींनी हजेरी लावली. अमेरिकेतील न्यू ऑरलियन्समध्ये हा सोहळा पार पडला. ज्या प्रसिद्ध व्यक्तींनी या सोहळ्यात हजेरी लावली होती त्यात पॉप गायिका बियोन्स, टेनिस खेळाडू कॅरोलिना वोझ्नियाकी, रिअॅलिटी स्टार किम कर्दाशिया यांचा समावेश होतो. 

लग्नाचे फोटो अद्याप समोर आलेले नाहीयेत. कारण सेरेनाने लग्नाच्या फोटोंसाठीचा करार वोगसोबत केलाय. वोग मॅगॅझिनचे संस्थापक एन विटां ही लग्नसोहळ्यात उपस्थित होते. 

सेरेना आणि अॅलेक्स यांना काही महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ती टेनिस कोर्टापासून दूर आहे. 

२१ वेळआ ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अॅलेक्स आणि सेरेना २०१५पासून एकमेकांना डेट करतायत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सेरेनाने सोशल मीडियावरुन तिच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.