India vs South Africa Women's Test match : भारत आणि दक्षिण अफ्रिका वुमेन्स संघामध्ये (IND vs SA) तब्बल 10 वर्षानंतर कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय टीम इंडियाने घेतला होता. अशातच आता कॅप्टन हरमनप्रीतचा निर्णय स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी खरा ठरवला आहे. सलामीवीर स्मृती (Smriti Mandhana) आणि शेफाली (Shafali Verma) यांनी शतक ठोकत टीम इंडियाला दमदार सुरूवात करून दिली. यामध्ये लेडी सेहवाग म्हणजेत शेफाली वर्माने धमाकेदार डबल सेंच्यूरी ठोकली आहे.
सलामीवीर शेफाली वर्माने धमाकेदार खेळी केली अन् चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शेफालीने 197 बॉलमध्ये 205 धावा केल्या. त्यात तिने 8 गगनचुंबी सिक्स आणि 28 फोर मारले. तर जोडीदार स्मृती मानधनाने 161 चेंडूत 149 धावांची खेळी केली. या दोन्ही सलामीवीरांनी 292 धावांची पार्टनरशीप केली. त्यामुळे आता सामन्याच्या तिसऱ्या दिवसांपर्यंत टीम इंडिया 495 धावा उभ्या केल्या आहेत. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्सने 55 धावांची महत्त्वाची खेळी केली.
दरम्यान, महिला दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय मालिका, एकमेव कसोटी सामना आणि टी-20 मालिका होणार आहे. त्यामुळे आता कसोटी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केल्याचं पहायला मिळतंय.
Milestone Alert
This is now the highest opening partnership ever in women's Tests
Smriti Mandhana & Shafali Verma
Follow the match https://t.co/4EU1Kp7wJe#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @mandhana_smriti | @TheShafaliVerma pic.twitter.com/XmXbU9V3M6
— BCCI Women (@BCCIWomen) June 28, 2024
टीम इंडिया वूमन्स टीम: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), शफाली वर्मा, स्मृती मानधना, दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, प्रिया पुनिया, सायका इशाक आणि उमा चेत्री.
दक्षिण आफ्रिका वूमन्स टीम : लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, ॲनेरी डेर्कसेन, नॉन्डुमिसो शांगासे, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), मसाबता क्लास, नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, डेल्मी टकर, तुमी सेखुखुने, मिके डी रिडर, नादिन डी क्लर्क आणि एलिझ-मारी मार्क्स.