शाहीद आफ्रिदीची तुफानी बॅटिंग ! ४३ चेंडूत १०१ धावा

 हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान काउंटी ग्राऊंड येथे झालेल्या नेटवेस्ट टी २० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी केली. आफ्रिदीने आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.

Updated: Aug 23, 2017, 12:36 PM IST
शाहीद आफ्रिदीची तुफानी बॅटिंग ! ४३ चेंडूत १०१ धावा  title=

लंडन :  हॅम्पशायर आणि डर्बीशायर यांच्यादरम्यान काउंटी ग्राऊंड,डर्बी येथे झालेल्या नेटवेस्ट टी २० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात हॅम्पशायरच्या शाहीद आफ्रिदीने तुफानी फटकेबाजी केली.

आफ्रिदीने आपल्या संघाला तब्बल १०१ धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली.
 
डर्बीशायरचा कर्णधार गॅरी विल्सन याने नाणेफेक जिंकून हॅम्पशायरला प्रथम फलंदाजी दिली. हॅम्पशायरकडून शाहिद आफ्रिदी आणि कॅल्विन डिकिसॉन हे सलामीवीर म्हणून मैदानात आले. त्यांनतर आफ्रिदीने तुफान फटकेबाजी करत दणदणीत विजय मिळवला. शाहिद आफ्रिदीच्या १०१ धावांच्या खेळीत त्याने १० चौकार आणि ७ षटकार मारले. १०१ पैकी तब्बल ८२ धावा आफ्रिदीने चौकार आणि षटकार यांच्या मदतीने पूर्ण केल्या. 

 

हॅम्पशायर टीमने २० ओव्हर्समध्ये २४९ धावा बनवल्या होता. २५० धावांचं लक्ष्य असणारी डर्बीशायर टीम १९.५ ओव्हर्समध्ये १४८ धावांमध्येच ऑलआऊट झाली. शाहीद आफ्रिदीच्या नावावर आता एक नवा विक्रम जमा झाला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट, लिस्ट अ क्रिकेट आणि टी २० क्रिकेटमध्ये डावात १०० धावा आणि ५ विकेट्स घेणारा आफ्रिदी ९वा खेळाडू ठरला आहे.