IND vs PAK T20 : भारताकडून पराभव, जावयाला कोहलीने मारलेला सिक्सर, आफ्रिदीने सोडलं मौन, म्हणाला...

IND vs PAK T20 World Cup 2022: शाहिद आफ्रिदीने आपली प्रतिक्रिया दिली आहे यावर तुमचं मत सांगा!

Updated: Oct 25, 2022, 06:27 PM IST
IND vs PAK T20 : भारताकडून पराभव, जावयाला कोहलीने मारलेला सिक्सर, आफ्रिदीने सोडलं मौन, म्हणाला...  title=

Shahid Afridi on IND vs PAK T20 World Cup 2022 : वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला थरारक सामना प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यामध्ये अखेर भारताच्या शिलेदारांनी पाकिस्तानच्या संघाला धूळ चारली. भारताच्या विजयानंतर दिग्गजांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. या सामन्यामध्ये नो बॉलवरून चांगलंच रान तापलं आहे. या वादामध्ये पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीने या वादात उडी घेतली आहे. (Shahid Afridi reacts to the no ball controversy in the ind pak match Sport Marathi News)

जेव्हा थर्ड अम्पायर आले आहेत तेव्हापासून अनेक रन आऊटचा योग्य निर्णय देण्यात येतोय. ऑन फिल्ड अम्पायर त्यांच्याकडे बाद की नाबाद ठरवण्याचा निर्णय सोपवतात. भारत-पाक सामन्यावेळीसुद्धा नो बॉल होता की नव्हता हा निर्णय पंचांनी थर्ड अम्पायरकडे सोपवायला हवा होता. मात्र त्यांनी आपापसात चर्चा करून नो-बॉल देण्याचा निर्णय घेतला. मैदानातील पंचाची एवढीही तीक्ष्ण नजर नसते ते एकदम अचूक सांगू शकतील, अशा शब्दात आफ्रिदीने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. 

शाहिद आफ्रिदीचा राग आपण समजू शकतो कारण भारताकडून वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यामध्ये झालेल्या पराभवामुळे तो हताश झाला असावा. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा होणारा भावी जावई शाहिनशाह आफ्रिदीला या सामन्यामध्ये विराट कोहलीने मारलेला गगनचुंबी सिक्सरमुळे आफ्रिदी दुखावला गेला आहे. त्यामुळे नो-बॉलच्या निमित्तावरून त्याने आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

दरम्यान, शेवटच्या षटकामध्ये भारताला 3 बॉलमध्ये 13 धावांची गरज होती. नवाझच्या चेंडूवर विराटने षटकार मारला आणि तो चेंडू अम्पायरने नो बॉल दिला होता. यावरून मोठा वाद तयार झाला असून क्रिकेटमधील दिग्गजांनीही यावर आक्षेप घेतला.