'देशप्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा...' RCBच्या खेळाडूवर संतापला शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि आयपीएलच्या वादात आता शेन वॉर्नची उडी पाहा काय म्हणाला...

Updated: Jun 27, 2021, 02:54 PM IST
'देशप्रेमापेक्षा पैसा महत्त्वाचा...' RCBच्या खेळाडूवर संतापला शेन वॉर्न title=

मुंबई: आयपीएल 2021च्या उर्वरित सामन्यात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सहभागी होणार नाहीत अशी भूमिका ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डनं घेतली आणि त्यानंतर खेळाडू आणि क्रिकेट बोर्डमध्ये वाद सुरू झाला. IPL चे उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार आहे. 

IPL 2021मध्ये सहभागी होऊ न दिल्याने आता खेळाडूंनी वेस्टइंडिज आणि बांग्लादेश दौऱ्यातून माघार घेतली. तर या दोन्ही दौऱ्यात न खेळणाऱ्यांनी टी 20 वर्ल्ड कपला खेळण्याची संधी दिली जाणार नसल्याचं अप्रत्यक्ष इशारा फिंचने दिला आहे. या सगळ्या वादात आता शेन वॉर्ननं उडी घेतली आहे. 

माजी दिग्गज क्रिकेटर शेन वार्न ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर खूप संतापले आहेत. आयपीएलला प्राथमिकता देणाऱ्या खेळाडूंना त्याने सुनावलं आहे. तर अशा खेळाडूंना टीममध्ये सामाविष्टच करून घेऊ नये असंही चिडलेल्या वॉर्ननं म्हटलं आहे. 

शेन वॉर्नने रोड टू एशेज पॉडकास्ट वर बोलताना म्हणाला की, 'खेळाडूंनी मिळवलेल्या पैशात मला काही अडचण नाही, ही चांगली गोष्ट आहे. जर त्यांना पैसे कमवायचे असतील तर ते कमवा. पण जर तुम्हाला तुमच्या देशासाठी क्रिकेट खेळायचे असेल आणि तुम्ही आयपीएलची निवड कराल, तर मग कदाचित त्यांना संघात निवडले जाण्याची पात्रता नसेल.

वॉर्न पुढे म्हणाला, 'आयपीएलमध्ये खेळल्यानंतर खेळाडू विश्रांतीची मागणी करतील आणि कसोटी सामना गमावतील. अशाप्रकारे हे खेळाडू पैशासाठी आपल्या देशाकडून खेळताना कसोटी गमावतील आणि हे असे होऊ नये असं मला वाटतं.

कोरोनामुळे स्थगित झालेले 4 मे रोजीनंतरचे सामने सप्टेंबर महिन्यात खेळवले जाणार आहेत. या सामन्यात जर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडू जर सहभागी झाले नाहीत तर त्यांचा बीसीसीआय पगार कापणार आहे. त्यामुळे हे खेळाडू पुरते कात्रीत सापडले आहेत.