IPL 2021 आधी पत्नीच्या दबावामुळे युवराज सिंहने उचललं हे पाऊल

युवराज सिंहच्या बॉलिंगची जशी चर्चा आहे तेवढीच चर्चा त्याच्या लूक आणि हेअर स्टाइलची होत असते.

Updated: Jun 27, 2021, 02:31 PM IST
IPL 2021 आधी पत्नीच्या दबावामुळे युवराज सिंहने उचललं हे पाऊल title=

मुंबई: युवराज सिंहच्या बॉलिंगची जशी चर्चा आहे तेवढीच चर्चा त्याच्या लूक आणि हेअर स्टाइलची होत असते. काही दिवसांपूर्वी युवीचा स्ट्रेट केसांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र त्याने पुन्हा एकदा लूक बदलला आहे. यावेळी कारणही तेवढंच खास आहे. ते म्हणजे एका व्यक्तीच्या दबावाखाली येऊन त्याने हा लूक बदलला आहे. 

युवराज सिंहने इन्स्टाग्राम व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने केस कर्ली केले आहेत. यामध्ये युवीने कॅप्शन दिलं आहे की काय छान वाटतं स्ट्रेट केस की कुरळे केस? त्यावर अनेक लोकांनी कुरळे केस अशी कमेंटही दिली आहे. युवी आपल्या हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

युवराजने आपल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे की, आपली पत्नी हेजलच्या दबावामुळे हेअरस्टाइल चेंज केल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या हेअरस्टाइलमुळे त्याच्यापेक्षा जास्त त्याची पत्नी हेजल खूप खूश आहे.

युवराज सिंहचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युवी आपल्या हेअरस्टाईलमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्यामुळे त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.