शॉन मार्शचं शतक, भारताला विजयासाठी २९९ धावांचं लक्ष्य

शॉन मार्शच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताला २९९ धावांचं आव्हान देता आलं आहे.

Updated: Jan 15, 2019, 01:09 PM IST
शॉन मार्शचं शतक, भारताला विजयासाठी २९९ धावांचं लक्ष्य title=

एडलेड : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ३ सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २९९ धावांच आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने ५० षटकांमध्ये ९ विकेट गमावत २९८  धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या दोन फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी स्वस्तात माघारी पाठवले. भारताने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला झटके द्यायला सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाचा पहिला झटका अरॉन फिंचच्या रुपात लागला. फिंचला भुवनेश्वरने ६ धावांवर बोल्ड केले. यानंतर मोहम्मद शमीने अॅलेक्स  कॅरीला १८ धावांवर झेलबाद केले. तिसऱ्या विकेटसाठी उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांनी ५६ धावांची भागीदारी केली. या भागीदारीला रविंद्र जडेजाने मोडीत काढले. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या उस्मान ख्वाजाला जडेजाने धावचित केले. ख्वाजाने २१ धावांवर आऊट झाला.

चौथ्या विकेट्साठी शॉन मार्श आणि पीटर हँड्सकाँबच्या यांनी ५२ धावा जोडल्या. यांच्या भागीदारीला जडेजाने मोडीत काढले. जडेजाने पीटर हँड्सकाँबला धोनीच्या होते यष्टीचीत केले. यानंतर मोहम्मद शमीने मार्कस स्टोइनिसला २९ धावांवर झेलबाद केले. यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि शॉन मार्श या दोघांनी संघाचा डाव सावरला. ६ व्या विकेट्साठी या जोडीने ९४ धावा जोडल्या. यानंतर ग्लेन मॅक्सवेलला भुवनेश्वर कुमारला ४८ धावांवर माघारी पाठवले. एका ठिकाणी विकेट जात असताना दुसऱ्या ठिकाणी शॉन मार्श एकटा खिंड लढवत होता. ऑस्ट्रेलियाला शॉन मार्शच्या खेळीने उभारी दिली. शॉर्न मार्शने संघासाठी १३१ धावांची महत्वपूर्ण कामगिरी केली. या खेळीत मार्शने ११ चौकार आणि ३ षटकार लगावले.

गोलंदाजांची कामगिरी

शॉन मार्शच्या या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाला भारताला २९९ धावांचं आव्हान देता आलं आहे. भुवनेश्वर कुमारला सर्वाधिक ४ विकेट पटकावले. त्याने १० षटकात केवळ ४५ धावा दिल्या. यात अरॉन फिंच, शॉन मार्ष आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या विकेटचा समावेश आहे. तर त्या खालोखाल मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या आहेत. तर जडेजाला १ विकेट घेता आली.