भारताची चांगली सुरुवात, ऑस्ट्रेलियाला ४ झटके

खलील अहमदच्या ऐवजी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. 

Updated: Jan 15, 2019, 11:41 AM IST
भारताची चांगली सुरुवात, ऑस्ट्रेलियाला ४ झटके title=

एडलेड : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्याला एडलेड येथे सुरुवात झाली आहे. दुसऱ्या सामान्यात भारताने संघात बदल केला आहे. खलील अहमदच्या ऐवजी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. तर ऑस्ट्रेलियाने संघात कोणतेही बदल केलेले नाहीत. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  ऑस्ट्रेलियाला पहिला झटका २० रनवर कर्णधार अरॉन फिंचच्या रुपात लागला. फिंच ६ धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने ७ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फिंचला बोल्ड केले.

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २६ रनवर असताना त्यांना दुसरा झटका लागला. मोहम्मद शमीने अॅलेक्स कॅरीला 18 धावांवर शिखर धवनच्या हातून झेलबाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका उस्मान ख्वाजाच्या रुपाने बसला. रविंद्र जडेजानी ख्वाजाला धावचीत केले. ख्वाजा २१ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचे नियमित कालांतराने विकेट गमावले. ऑस्ट्रेलियाला चौथा झटका पीटर हँड्सकाँबच्या रुपाने बसला. त्याला धोनीने जडेजाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले.

सध्या खेळपट्टीवर शॉन मार्श ७१ धावांवर आणि मार्कस स्टोइनिस १४ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलिया सध्या ३३.२ षटकात ४ बाद १६० रनवर खेळत आहे.

भारताची एडलेडवरील कामगिरी

भारतीय संघाने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडलेड मैदानावर १४ सामने खेळले आहेत. त्यापैकी ८ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. तर एक सामना अनिर्णित ठरला आहे. 

भारतासाठी आजचा सामना मह्त्वपूर्ण आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला तर ही एकदिवसीय मालिका भारताला गमवावी लागेल. ही मालिका गमावली तर भारताचा हा चौथा मालिका पराभव ठरेल. भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २००७-०८ पासून ते आतापर्यंत एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही आहे. यामध्ये एक द्विसंघ आणि एक तिरंगी मालिकेचाही समावेश आहे.