IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण

वन-डे, कसोटीत धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूचं कसोटीत पदार्पण, कोण आहे हा पाहा....

Updated: Nov 24, 2021, 03:19 PM IST
IND vs NZ: मुंबईच्या धडाकेबाद फलंदाजाचं कसोटीत पदार्पण title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सीरिज जिंकल्यानंतर आता लक्ष्य कसोटी सीरिजकडे आहे. 25 नोव्हेंबपासून कानपूर इथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. के एल राहुल जखमी झाला आहे. त्यामुळे तो सीरिजमध्ये खेळू शकत नाही. 

टीम इंडियातील दिग्गज आणि अनुभवी खेळाडूंना पहिल्या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य राहाणेनी मुंबईच्या खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. 

मयंक अग्रवाल आणि शुभमन गिल ओपनिंगला उतरणार आहेत. या सामन्यात मुंबईचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर डेब्यू करणार आहे. आतापर्यंत वन डे आणि टी 20 सामने श्रेयस खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीमध्ये खेळण्याची संधी श्रेयसला 25 नोव्हेंबरला मिळणार आहे. 

आता श्रेयस अय्यरचं नाव तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये समाविष्ट होणार आहे. श्रेयसने 22 वन डे सामने खेळून त्यामध्ये 813 धावा केल्या आहेत. तर 32 टी 20 सामने खेळून त्यामध्ये 580 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये 87 सामने खेळून 2375 केल्या आहेत. 

श्रेयस अय्यर या संधीचं कसं सोनं करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. न्यूझीलंड विरुद्धचा कसोटी सामना ही श्रेयससाठी मोठी संधी आहे. त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. 

टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव