Shubhman Gill : यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) युवा खेळाडूंनी उत्तम कामगिरी केल्याचं दिसून आलं. यामध्ये शुभमनच्या ( Shubhman Gill ) नावाची चर्चाही पहायला मिळाली. गुजरात टायटन्सकडून खेळताना टीम इंडियाचा युवा खेळाडू शुभमन गिलने ( Shubhman Gill ) यंदाच्या आयपीएलमध्ये 16 सामन्यांमध्ये एकूण 851 रन्स केले आहेत. यंदाच्या सिझनची ऑरेंज कॅप देखील गिलच्याच डोक्यावर आहे. अशातच टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव ( Kapil dev ) यांनी गिलबाबत मोठं विधान केलंय.
भारत असो किंवा आयपीएलमधील गुजरात टायटन्स शुभमन गिलची बॅट सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतोय. यंदाच्या आयपीएलमध्ये शुभमन गिलने 3 शतकं ठोकली आहे. मात्र असं असूनही त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल संतुष्ट नाहीयेत.
एका इंटरव्ह्यू दरम्यान बोलताना कपिल देव म्हणाले की, सुनील गावसकर आले, सचिन तेंडुलकर आले, मग राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली हे सर्व खेळाडू चमकले. सध्या गिल ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्यावरून तो या खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचं दिसतंय. त्यामुळे मला असं वाटतं की, गिल बद्दल मोठे दावे करण्यापूर्वी मी त्याला अजून एक सीझन खेळण्याची संधी देऊ इच्छितो.
कपिल देव पुढे म्हणाले की, शुभमन गिलकडे टॅलेंट आहे मात्र सध्या त्याची तुलना मोठ्या खेळाडूंशी केली जाऊ शकत नाही. यासाठी त्याला अजून काहीवेळ खेळावं लागणार आहे. पुढील अजून एका सिझनमध्ये त्याने चांगला खेळ केला तर आपण म्हणू शकतो की, तो गावस्कर, सचिन आणि कोहली यांच्यानंतर एक खेळाडू आहे.
कपिल देव यांच्या म्हणण्याप्रमाणे, एक किंवा दोन चांगल्या सिझननंतर गोलंदाजांना तुमची ताकद आणि कमकुवतपणा समजू लागतो. अशातच देखील तो खेळाडू चांगला तीन चार सिझन चांगला खेळला, तर आपण त्याला महान खेळाडू म्हणू शकतो.
त्याची चांगली कामगिरी जेव्हा संपेल तेव्हा तो कसं कमबॅक करेल, हे पाहण्याची मला उत्सुकता आहे. मुळात गिल फोर मारताही तो घाबरत नाही आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. मला गिलच्या क्षमतेबद्दल शंका नाही. पण मी एका क्रिकेटपटूचा उल्लेख करू इच्छितो, ज्याचं नाव आहे विनोद कांबळी. सुरुवात चांगली झाली पण नंतर त्याची कामगिरी घसरली. अशा परिस्थितीत गिलसमोर सर्वात मोठा प्रश्न असेल की तो स्वत:ला नीट सांभाळू शकेल का? तरुण वयात तो कसा सामना करेल?, असे प्रश्नही कपिल देव यांनी उपस्थित केले आहेत.