Sara Tendulkar वरून चिडवताच लाजला Shubman Gill, व्हिडीओ झाला व्हायरल

 या शुभमनचा (Shubman Gill) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चाहते सचिन तेंडुलकरच्या नावाने मजा घेत होते.

Updated: Jan 19, 2023, 09:05 PM IST
Sara Tendulkar वरून चिडवताच लाजला Shubman Gill, व्हिडीओ झाला व्हायरल title=

Shubman Gill: भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्याविरूद्ध 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु आहे. 18 जानेवारी रोजी या सिरीजमधील पहिला सामना खेळवण्यात आला. ज्यामध्ये टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडवर 12 रन्सने विजय मिळवला. या सिरीजमध्ये भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो शुभमन गिल. दरम्यान या शुभमनचा (Shubman Gill) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media viral) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये चाहते सचिन तेंडुलकरच्या नावाने मजा घेत होते.

टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिलने  किवींच्या विरूद्ध पहिल्या वनडेमध्ये डबल सेंच्युरू ठोकली. त्याच्या या खेळीमुळे तो चांगलाच चर्चेत होता. अशातच आता गिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सचिनच नाव ऐकताच  Shubman Gill गिल लाजला

शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, सारा आणि गिल यांच्यात प्रेम संबंध आहेत. मात्र अजून याची अधिकृतरित्या कोणीही घोषणा केली नाही.

अशातच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शुभमन बसमध्ये बसलेला दिसतोय. यावेळी बसच्या खिडकीतून तो चाहत्यांना हात मिळवतोय. इतक्यात एक चाहता त्याला म्हणतो, की सचिनची काळजी घ्या. यावेळी त्याला साराच्या वडिलांच्या नावावरून चिडवण्यात आलं. यानंतर शुभमन गिल लाजला आणि खिडकी बंद केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by  (@sarcastictube)

न्यूझीलंडविरूद्ध शुभमन गिलची वादळी खेळी

पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. टीम इंडियाकडून सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Shubman Gill) उतरले होते. दोघांनी सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी केली होती. या फटकेबाजीत रोहित शर्मा 34 धावा करून आऊट झाला. मात्र मैदानात शुभमन एकाकी झुंज देत होता. 

टीम इंडियाचे एका मागोमाग एक विकेट पडत असताना शुभमन गिल (Shubman Gill Double Century) मात्र चांगल्या लयीत खेळत होता.त्याने डबल सेंच्यूरी देखील ठोकली. मात्र या सेच्यूरीनंतर तो बाद झाला. टीम इंडियाकडून सर्वाधिक 208 धावा शुभमन गिलने ठोकल्या आहेत. 149 बॉलमध्ये त्याने ही डबल सेच्यूरी ठोकली आहे. यामध्ये त्याने 19 चौकार आणि 9 षटकार ठोकले आहे.