एअरपोर्टवर चोरून एकमेकांना भेटले Shubman Gill आणि सारा; दोघांची भेट कॅमेरात कैद!

एकंदरीत सारा या नावामुळे शुभमन गिलचं नावं चांगलंच चर्चेत आलं आहे. सारा आणि शुभमन यांच्या नावांची चर्चा असतानाच दोघांना एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे.

Updated: Feb 4, 2023, 04:51 PM IST
एअरपोर्टवर चोरून एकमेकांना भेटले Shubman Gill आणि सारा; दोघांची भेट कॅमेरात कैद!

Shubman Gill meets sara at airport : भारतीय क्रिकेट टीमचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सध्या त्याच्या तुफान फलंदाजीमुळे चांगलाच चर्चेत आले. खेळांच्या चर्चांसोबतच तो त्याच्या डेटींग लाईफमुळे देखील सोशल मीडियावर फेमस (social media) झालाय. गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव टीम इंडियाचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) जोडण्यात आलं. तर कधी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) शुभमनच्या डेटींगच्या चर्चा आहे.

एकंदरीत सारा या नावामुळे शुभमन गिलचं नावं चांगलंच चर्चेत आलं आहे. सारा आणि शुभमन यांच्या नावांची चर्चा असतानाच दोघांना एअरपोर्टवर एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दोघांनाही शुक्रवारी एकत्र पाहण्यात आलं. 

Shubman Gill आणि सारासोबतच्या अफेयरची चर्चा 

शुक्रवारी म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी शुभमन गिलला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. ज्याठिकाणी एका चाहत्याने त्याला बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत पाहिलं आणि त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो अहमदाबाद एअरपोर्टवर असल्याचा दावा करण्यात येतोय. सारा आणि शुभमन थोडं बाजूला जाऊन एकमेकांशी बोलत असल्याचं कॅमेरात कैद झालं आहे. दरम्यान या फोटोमध्ये किती तथ्य आहे याची पुष्टी झी 24 तास करत नाही.

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये टीम इंडियाचा युवा फलंदाज निळ्या रंगाच्या हुडीमध्ये दिसतोय. तर साराने प्रिंटेड जम्पर घातलं आहे. दरम्यान सारा आणि शुभमन यांच्या रिलेशन आणि डेटींगची चर्चा ही निव्वळ एक अफवा आहे. कारण दोघांपैकी एकानेही या नात्यावर खुलेपणाने चर्चा केलेली नाही. 

सारा तेंडुलकर की सारा अली खान

एके वेळ अशी होती जिथे शुभमन गिलचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्यासोबत जोडलं जातं होतं. मात्र त्यानंतर अशी बातमी समोर आली की, दोघांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे. मात्र सारा नंतर आणखी एक सारा म्हणजेच सारा अली खानची एंट्री झाली. सारा अली खानला अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट केलं होतं.

भर स्टेडियममध्ये साराच्या नावाने शुभमनला चिडवलं (Shubman Gill Teased By Sara Name)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हीडिओमध्ये चाहते म्हणतायत की,  'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो'. शुभमन गिलला साराच्या नावाने डिवचण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. चाहते सुभमनला साराच्या नावाने चिडवण्याची एक संधी सोडत नाहीत.