सारा वहिनी अजून किती मेहनत...; गोलंदाजी पाहून Shubman Gill चाहत्यांकडून ट्रोल!

चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी जेव्हा सामना ड्रॉ होणार असं निश्चित मानलं जात होतं, त्यावेळी शुभमन गिलने गोलंदाजी केली. शुभमन पार्ट टाईम लेग स्पिनर आहे. 

Updated: Mar 14, 2023, 07:30 PM IST
सारा वहिनी अजून किती मेहनत...; गोलंदाजी पाहून Shubman Gill चाहत्यांकडून ट्रोल! title=

Shubman Gill Bowling: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये नुकतंच बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची (Border Gavaskar Trophy) सिरीज संपली. या सिरीजमध्ये टीम इंडियाचं वर्चस्व दिसून आलं. पहिले दोन सामने भारताने तर तिसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. यावेळी चौथा टेस्ट सामना ड्रॉ झाला. दरम्यान हा सामना ड्रॉ होण्याच्या मार्गावर असताना रोहित शर्माने (Rohit Sharma) गोलंदाजीसाठी चेतेश्वर पुजारा (heteshwar Pujara) आणि शुभमन गिलच्या (Shubman Gill) हाती बॉल दिला. दरम्यान शुभमनची गोलंजाजी पाहिल्यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा त्याला साराच्या नावाने सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. 

Shubman Gill अतरंगी गोलंदाजी

चौथ्या टेस्टच्या पाचव्या दिवशी जेव्हा सामना ड्रॉ होणार असं निश्चित मानलं जात होतं, त्यावेळी शुभमन गिलने गोलंदाजी केली. शुभमन पार्ट टाईम लेग स्पिनर आहे. यावेळी शुभमनने जसा पहिला बॉल टाकला तसं सोशल मीडियावर मीम्स फिरू लागले. यावेळी एका युझरने, 'सारा वहिनी, अजून किती मेहनत करवून घेणार?' असा सवाल केला आहे.

स्टेडियममध्ये चाहत्यांनी शुभमनला चिडवलं

इंदूरप्रमाणे अहमदाबादच्या टेस्ट सामन्यात स्टेडियममध्ये असलेले प्रेक्षक शुभमनला साराच्या नावाने चिडवत असल्याची जोरदार चर्चा रंगली. यावेळी त्याला पाहून प्रेक्षक “हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो।” असे ओरडू लागले. यापूर्वी अनेकदा गिल दिसला की प्रेक्षकांनी असे नारे लगावले होते

सारा आणि गिलच्या अफेअरची चर्चा

शुभमनच नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत जोडलं जातं. सारा आणि शुभमन यांचं अफेअर असल्याची कथित चर्चा आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, सारा आणि गिल यांच्यात प्रेम संबंध आहेत. मात्र अजून याची अधिकृतरित्या कोणीही घोषणा केली नाही.

पुजाराची आश्चर्यकारक गोलंदाजी

रोहित शर्माने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत टीम इंडियाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे बॉलिंग (Cheteshwar Pujara Bowling) सोपवली. पुजाराने नीटनेटकी ओव्हर टाकली. पुजाराने एका ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिला. पुजाराच्या ओव्हरचं समालोचकांनी देखील कौतुक केलंय.