....'हे' कारण देत भारताच्या 'उसेन बोल्ट'ने नाकारली नॅशनल ट्रायलची ऑफर

अवघ्या काही क्षणांमध्येच तो इतका लोकप्रिय झाला, की..... 

Updated: Feb 18, 2020, 12:54 PM IST
....'हे' कारण देत भारताच्या 'उसेन बोल्ट'ने नाकारली नॅशनल ट्रायलची ऑफर title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या श्रीनिवास गौडा याने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. चिखलाने भरलेल्या शेतात म्हशींसोबत अतिशय वेगाने धावलेल्या श्रीनिवासला भारताचा उसेन बोल्ट, म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं. 

अवघ्या काही क्षणांमध्येच तो इतका लोकप्रिय झाला, की थेट केंद्र सरकारकडूनही त्याची दखल घेण्यात आली. 'साई' म्हणजेच स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडियाकडून त्याला ट्रायलसाठीचं बोलावणंही पाठवण्यात आलं होतं. पण, गौडाने मात्र यामध्ये सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ जेव्हा केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांच्यापर्यंत पोहोचला तेव्हा त्यांनाही या तरुणात एक चमक दिसली. ज्या बळावर त्यांनी त्याला एक संधी देऊ करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. 

राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही संधी नाकारत गौडाने आपल्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं. शिवाय आपलं सर्व लक्ष हे कंबाला शर्यतीवर असल्याचं त्याने स्पष्ट केलं. आपल्याला शेतातच म्हशींसोबत धावण्याची सवय असल्याचं तो म्हणाला. दरम्यान, कंबाला अकादमीचे सचिव गुणापा कंबाडा यांच्या म्हणण्यानुसार श्रीनिवास या राष्ट्रीय ट्रायलमध्ये सहभागी होऊ शकत नाही. कारण, पुढील तिन्ही शनिवार ही कंबाला रेस असणार आहे. 

वाचा : विराट कोहलीच्या आलिशान हॉटेलमध्ये मिळतात अफलातून पदार्थ

श्रीनिवासची किमया... 

कंबाला रेस नावाच्या पारंपरिक खेळाममध्ये गौडाने १४५ मीटरचं अंतर १३.६२ सेकंदांमध्ये पूर्ण करत एक नवा विक्रम रचला होता. या शर्यतीदरम्यान जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उसेन बोल्ट याच्याहूनही जास्त वेगात तो धावला होता. बोल्टच्या नावे १०० मीटरची शर्यत ९.५८ सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम आहे.