वाढदिवशी KL Rahul ची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्रीने शेअर केला हा खास फोटो

केएल राहुलला मिठी मारतानाचे फोटो इंस्टाग्रामवर केले शेअर

Updated: Apr 18, 2022, 09:34 PM IST
वाढदिवशी KL Rahul ची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्रीने शेअर केला हा खास फोटो title=

KL Rahul Birthday : क्रिकेटर केएल राहुल आज 18 एप्रिल रोजी वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी केएल राहुलचे कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या यादीत तुम्ही त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीचे नाव कसे सोडू शकता. अथियाने तिचा बॉयफ्रेंड केएल राहुलसोबतचे खूप खास आणि न पाहिलेले रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

अथियाच्या पोस्टवर केएल राहुलची प्रतिक्रिया

केएल राहुलला मिठी मारताना अथियाची हे इंस्टाग्राम फोटो त्यांच्यामधील प्रेम संबंधांचा स्पष्ट पुरावा देत आहेत. हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करून अथियाने केएल राहुलसाठी प्रेमाचे दोन शब्द लिहिले आहेत. अथियाने लिहिले- 'तुझ्यासोबत कुठेही, वाढदिवसाच्या शुभेच्छा...' अथियाची दोन शब्दांची ही बर्थडे नोट केएल राहुलबद्दल तिच्या प्रेमळ भावना दर्शवते. अथियाला उत्तर देताना केएल राहुलनेही लिहिले- 'लव्ह यू'.

पहिल्या फोटोत अथिया केएल राहुलला मिठी मारताना आणि कॅमेऱ्याकडे बघून हसताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोत अथिया आणि केएल राहुल जंगलाच्या मध्यभागी बनवलेल्या वाटांवर एकमेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत. तिसरा फोटो बसच्या सीटवर अथिया आणि केएल राहुलचा सेल्फी आहे.

वाढदिवसाव्यतिरिक्त केएल राहुल सध्या आयपीएल 2022 मुळे देखील चर्चेत आहे. लखनौ सुपर जायंट्सचा (एलएसजी) कर्णधार केएल राहुलने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध धडाकेबाज खेळी केली. त्याने 56 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. केएल राहुलचा हा 100 वा आयपीएल सामना होता ज्यात त्याची धावसंख्या आतापर्यंतची सर्वोच्च आयपीएल धावसंख्या होती.