Manu Bhaker Ramp Walk : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये भारताला शूटिंगमध्ये दोन कांस्य पदक जिंकवून देणारी मनू भाकर ही नुकत्याच पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसली. मनू भाकर पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या फॅशन शो मध्ये वॉक केला. यावेळी मनूच्या ग्लॅमरस लूक आणि रॅम्प वॉकने प्रेक्षकांची मन जिंकली. फॅशन शो मध्ये तिचा रॅम्प वॉक इतका प्रभावशील होता की तिच्या समोर बड्या अभिनेत्री सुद्धा फेल ठरल्या.
सोशल मीडियावर मनू भाकरच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून यात मनू भाकर खूप सुंदर दिसत आहे. लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्प वॉक करता मनू भाकरसाठी खास ड्रेस तयार करण्यात आला होता. हा ड्रेस लेदर पासून बनला होता. काळ्या रंगाचा लेदर ड्रेस आणि त्यावर फ्लोरोसंट रंगाचं जॅकेट, हाय हिल्स घालून मनू भाकरने हा रॅम्प वॉक केला. यावेळी मनूने वॉक करताना फायरिंग पोझ देखील दिले.
हेही वाचा : IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत
#WATCH | Delhi | Olympic medallist shooter Manu Bhaker walks the ramp at Lakme Fashion Week pic.twitter.com/ozfPv0JJUT
— ANI (@ANI) October 11, 2024
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकरने भारताला 2 पदक जिंकवून दिली. हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात मनूचा जन्म झाला. 14 वर्षांपासून मनूने शूटिंगमध्ये आपले करिअर सुरु केले. मनू भाकरने 2017 मध्ये तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत ऑलिंपियन हीना सिद्धूला पराभूत करून नवीन विक्रम केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकले. याशिवाय 2018 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. मनू भाकर ही युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.