IPL 2023: ना रोहित ना बटलर; Sreesanth ची मोठी भविष्यवाणी.. म्हणतो, 'हा' खेळाडू धमाका करणार!

IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये सॅमसन धुंवाधार फलंदाजी करत मैदानात धमाल करू शकतो आणि तो राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो, असं श्रीसंत (S Sreesanth On Sanju Samson) म्हटला आहे.

Updated: Mar 24, 2023, 05:01 PM IST
IPL 2023: ना रोहित ना बटलर; Sreesanth ची मोठी भविष्यवाणी.. म्हणतो, 'हा' खेळाडू धमाका करणार!
Sanju Samson,IPL 2023, S Sreesanth

Sreesanth On Sanju Samson: सर्वांची प्रतिक्षा असलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामास (When started IPL 2023?) येत्या 31 तारखेपासून सुरूवात होत आहे. पहिला सामना (ipl 2023 first match) चेन्नई आणि गुजरात (GT vs CSK) यांच्यात खेळला जाईल. त्यामुळे आता सर्वांची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. अशातच आता 10 वर्षानंतर मैदानात पुनरागमन केलेल्या एस श्रीसंतने (S Sreesanth) मोठी भविष्यवाणी केली आहे. (S Sreesanth On Sanju Samson Path Back Into Indian Squad Goes Through IPL 2023 latest sports news)

काय म्हणाला S Sreesanth?

एस श्रीसंतने संजू सॅमसनबद्दल ( Sanju Samson) एक भाकीत वर्तवलंय. श्रीसंतच्या म्हणण्यानुसार, आयपीएल 2023 मध्ये सॅमसन धुंवाधार फलंदाजी करत मैदानात धमाल करू शकतो आणि तो राजस्थान रॉयल्ससाठी ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो, असं श्रीसंत (S Sreesanth On Sanju Samson) म्हटला आहे.

भारतीय संघात एन्ट्रीसाठी संजू सॅमसन चमकदार कामगिरी करेल आणि भरपूर धावा करेल अशी मला मनापासून आशा आहे, असं श्रीसंत म्हणालाय. एकीकडे वनडे सामन्यात सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) फ्लॉप परफॉर्मन्स पाहिल्यानंतर आता संघात संजू सॅमसनला संधी देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच आता आयपीएलमध्ये संजू कशी कामगिरी करतोय? यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.

एस श्रीसंत याचं 10 वर्षानंतर कमबॅक

एस श्रीसंत त्याच्या स्पॉट-फिक्सिंग (spot fixing) प्रकरणाच्या 10 वर्षानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये समालोचक (commentator) म्हणून परतणार आहे. 40 वर्षीचा श्रीसंत 2013 मध्ये अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांच्यासह राजस्थान रॉयल्सचे (RR) प्रतिनिधित्व करताना दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर बॅन लावण्यात आला होता.

दरम्यान, मागील वर्षी फायनल (IPL 2022 Final) गाठणाऱ्या राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) यंदा तगडी टीम मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी राजस्थान आयपीएलचा (IPL 2023) कप उचलणार का? अशी चर्चा होताना दिसत आहे.

कसा असेल RR चा संघ?

Team Rajasthan Royals: संजू सॅमसन (C), यशस्वी जैस्वाल, शिमरॉन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युझवेंद्र चहल, केसी कॅरीअप्प, जेसन होल्डर, डोनाव्हॉन फरेरा, कुणाल राठौर, अॅडम झाम्पा, केएम आसिफ, एम अश्विन, आकाश वशिष्ठ, अब्दुल पीए, जो रूट