फलंदाजांसाठी नंदनवन मानल्या जाणाऱ्या हैद्राबादच्या सपाट पिचवर नेहमीच गोलंदाजांना मार खावा लागतो, अनेक तज्ज्ञांचे असं मत आहे की, हैदराबादची पिच ही बॅटिंगसाठी लाभदायक असणार असून, साऱ्या गोलंदाजांचा आज कस लागणार आहे. दोघं संघांच्या कॅप्टन्सची नजर ही टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यावर असणार आहे. अशातच टॉस जिंकणं आजच्या सामन्यात अतिशय महत्वाचं होणार आहे.
हैदराबाद आणि मुंबई यांच्यात होणाऱ्या सामन्यात पावसाचा थोडाही अंदाज वर्तवला जात नाहीये. त्यामुळे दर्शक ही मॅच पावसाच्या व्यत्ययाविना बघू शकणार आहेत. तरी आयपीएल ही मार्च महिन्यात खेळवली जात असल्यामूळे हैदराबादमध्ये खूप जास्त ऊष्णता असून, हवामान खाताच्या अंदाजाप्रमाणे, हैद्राबादमध्ये आज अधिक तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार असून, सर्वात कमी 25 अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे.
आयपीएलमधील दोन बलाढ्य संघ आज हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर भिडणार आहेत. हैद्राबाद आणि मुंबई या दोघं संघांना आपल्या पहिल्या विजयाची आस लागलेली आहे. मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना गुजरात टायटन्सविरूद्ध थोडाशा फरकाने गमावलेला होता, तर सनरायजर्स हैद्राबादला, कोलकत्ता नाईट रायडर्सने अगदी अती-तटीच्या सामन्यात पराभव केलं होतं.
आयपीएल 2024 च्या नव्या मोसमाला सुरूवात झाली असुन, क्रिकेटप्रेमींना आयपीलचा आजचा सामना हा टीव्हीवर स्टार स्पोर्टसच्या चॅनलवर तर, ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर अगदी मोफत बघता येणार आहेत.
आयपीएल 2024 मुंबई इंडियन्सने स्कॉड -
हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पीयूष चावला, गेराल्ड कोएत्जी, टीम डेविड, श्रेयस गोपाल, ईशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी , नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णु विनोद, नेहल वढेरा, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव.
आयपीएल 2024 सनरायजर्स हैद्राबाद स्कॉड -
पॅट कमिंस (कॅप्टन), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडेन मार्कराम, ट्रॅविस हेड, वानिंदु हसरंगा, मार्को यानसन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंह, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंह, मयंक मारकंडे, उपेन्द्र सिंह यादव, उमरान मलिक, नीतीश कुमार रेड्डी, फजलहकफारूकी, शाहबाज अहमद, जयदेव उनादकट, आकाश सिंह, जाथवेध सुब्रमण्यन.