मुंबई : दिल्ली टीमचं टेन्शन वाढलं आहे. ऋषभ पंतसाठी एक वाईट बातमी आली आहे. दिल्लीचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू मिचेल मार्शच्या दुखापतीवर मोठी अपडेट आली आहे.
मिचेल मार्शला दुखापत झाली आहे. अजूनही तो दुखापतीमधून बाहेर आला नाही. तो येणाऱ्या पुढच्या तीन ते चार सामन्यात खेळताना दिसणार नाही. दिल्ली टीमने 6.50 कोटी रुपये देऊन त्याला टीममध्ये घेतलं होतं. मात्र आता त्याला दुखापत झाल्याने तो खेळू शकत नाही.
मिचेल मार्शच्या हेल्थबाबत रिकी पाँटिंग यांनी माहिती दिली आहे. कोलकाता विरुद्ध सामन्यात तो मैदानात येईल अशी अपेक्षा होती. मात्र तो पूर्णपणे बरा अजून झाला नाही. त्याची दुखापत अजून वाढली आहे. त्यामुळे पुढचे 4 सामने तरी तो अजून मैदानात खेळण्याची शक्यता कमी आहे.
दिल्ली टीम सध्या पाँईंट टेबलमध्ये 4 पैकी 2 सामने जिंकले आहेत. 2 सामने पराभूत झाले आहेत. बंगळुरू विरुद्ध दिल्लीचा पुढचा सामना आहे. 16 एप्रिलला हा सामना होणार आहे. मार्शची जागा कोण घेणार याची उत्सुकता आहे.