कर्णधार स्मिथने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ सध्या जबरदस्त कामगिरी करतोय. सुरु असलेल्या अॅशेस सीरिजच्या तिसऱ्या टेस्टमध्ये शतक ठोकण्यासोबतच स्मिथने भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडलाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 16, 2017, 03:22 PM IST
कर्णधार स्मिथने मोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड title=

पर्थ : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ सध्या जबरदस्त कामगिरी करतोय. सुरु असलेल्या अॅशेस सीरिजच्या तिसऱ्या टेस्टमध्ये शतक ठोकण्यासोबतच स्मिथने भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडलाय.

कर्णधार स्टीव्हन स्मिथचे कसोटीतील २२वे शतक ठोकले. २२ शतक वेगाने पूर्ण करणारा तो तिसरा क्रिकेटर आहे. स्मिथने इंग्लंडविरुद्ध पर्थमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये जसे शतक पूर्ण केले तसे त्याने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला.

२८ वर्षीय स्मिथने २२वे शतक १०८व्या डावात केले. सचिनने २२वे शतक ११४व्या डावात केले होते. क्रिकेट जगतातील प्रसिद्ध डॉन ब्रॅडमन यांनी ५८ डावांत २२ कसोटी शतक पूर्ण केले होते. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने सलग चौथ्या वर्षी एक हजाराहून अधिक धावा केल्यात. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मॅथ्यू हेडनने २००१ ते २००५ दरम्यान सलग पाच वर्षे एक हजाराहून अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता.