मुंबई : भारतीय फुटबॉल टीमचा कर्णधार सुनील छेत्रीनं ट्विटरवरुन चाहत्यांना एक भावनिक आवाहन केलंय. स्टेडियमवर या, आम्हाला पाठिंबा द्या, कारण फुटबॉलला तुमची गरज आहे, असं आवहान त्यानं फुटबॉलप्रेमींना केलंय. शनिवारी मुंबईत झालेल्या सामन्याला फुटबॉलच्या मैदानात अडीच हजारच प्रेक्षक होते. तुम्ही युरोपियन संघाना जीव तोडून सपोर्ट करता. आमचा तो दर्जा नाही हे मान्य आहे. पण त्यासाठी पाठिंबा द्या, आम्हाला शिव्या द्या, टीका करा अथवा कौतुक करा, पण भारतीय फुटबॉलला तुमची गरज आहे. छेत्रीच्या या भावनिक आवाहनाला विराट कोहलीनंही रिट्विट करुन प्रेक्षकांन पाठिॆंबा देण्याची विनंती केली आहे. १४ जूनपासून फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात होतेय आणि भारतात तर फुटबॉलचे असंख्य चाहते आहेत, त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर छेत्रीचं ट्विट अधिक महत्त्वाचं आहे.